शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

टिप्पर गँगच्या सहा जणांवर मोक्कान्वये दोषारोपपत्र

By admin | Updated: November 16, 2016 01:09 IST

महासंचालकांची परवानगी : पोलिसांनी गुन्हेगारांची मांडली कुंडली; आणखी काही सराईत रडारवर

नाशिक : सिडकोतील कुविख्यात टिप्पर गँगमधील सहा सराईत गुन्हेगारांवर विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांच्या न्यायालयात मंगळवारी (दि़ १५) मोक्कान्वये ९५० पानी दोषारोपपत्र तर इतर सात गुन्हेगारांविरोधात भारतीय दंड विधान कलमानुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले़ यामध्ये पोलिसांनी या गुन्हेगारांची कुंडलीच मांडली आहे़ दरम्यान, अपर पोलीस महासंचालक एस़ पी़ यादव हे पंचवटीतील परदेशी गँगप्रमाणे मोक्कान्वये दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी देता की नाही याबाबत नागरिकांमध्ये साशंकता होती़सिडकोतील शुभम पार्कमधील फळविक्रेता शुभम भावसार यास ३१ जून २०१६ रोजी पिस्तुलाचा धाक दाखवून टिप्पर गँगच्या गुन्हेगारांनी पाच लाखांची खंडणीची मागणी केली होती़ तसेच त्याच्या आईवडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देत बेदम मारहाण करून खिशातील रोकड काढून घेतली होती़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सापळा रचून टिप्परचा शाकीर नासीर पठाण ऊर्फ मोठा पठाण, गणेश सुरेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्या, सोन्या बापू पवार, वसीम शेख, शाहीद सय्यद, किरण ज्ञानेश्वर पेलमहाले, देवदत्त तुळशीराम घाटोळे, मुकेश दलपतसिंग राजपूत यास अटक केली होती़तत्कालीन पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या आदेशानुसार मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी करून आणखी सहा संशयितांना अटक केली़ त्यामध्ये शासकीय ठेकेदार स्वप्निल गोसावी व सिन्नर तालुक्यातील अमोल जाधव, गोरख वसंत वऱ्हाडे या दोन वाळू व्यावसायिकांचाही समावेश होता़ या प्रकरणी पंचवटीतील सराईत गुन्हेगार व नगरसेवकांचीही चौकशी करण्यात आली होती़दरम्यान, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. पी. यादव (कायदा व सुव्यवस्था) यांनी मंगळवारी (दि. १५) टिप्परच्या सहा गुन्हेगारांविरोधात मोक्कान्वये दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी दिली़ तर इतरांविरोधात भादंवि कलमान्वये दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले़ पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या प्रयत्नांमुळेच टिप्परच्या गुंडांवर ही मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे़ (प्रतिनिधी)