शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूर, अर्जुनसागरमधून नदीपात्रात विसर्ग

By admin | Updated: July 17, 2017 00:43 IST

कळवण : चणकापूर व अर्जुनसागर ( पुनंद) प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने गिरणा व पुनंद नदीपात्रात पूरपाणी सोडण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात व कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, पाणी वाढत असल्याने चणकापूर व अर्जुनसागर ( पुनंद) प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने गिरणा व पुनंद नदीपात्रात पूरपाणी सोडण्यात आले आहे.  कळवण शहरासह तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ झाली असून, ओव्हरफ्लो झालेल्या चणकापूरमधून ३००० क्यूसेसने गिरणा नदीपात्रात, तर अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून २००० क्यूसेसने नदीपात्रात विसर्ग होत असल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढत चालली आहे, तर चणकापूर प्रकल्पातून चणकापूर उजव्या कालव्यात ५० क्यूसेसने पूरपाणी सोडण्यात आले आहे. गेल्या गुरु वारी १२५.७९ मिमी, शुक्र वारी १५८.७० मिमी, तर शनिवारी गेल्या २४ तासांत तालुक्यात सरासरी १७६.६ मिमी पाऊस पडला असल्याचे सूत्रांनी सांगितले .  चणकापूर प्रकल्प लाभक्षेत्रात २९७ मिमी पाऊस पडला असून, अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्प लाभक्षेत्रात ४०० मिमी पाऊस पडला. चणकापूरमध्ये ११४० दशलक्ष घनफूट (४३ टक्के), तर अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पात ६५० दशलक्ष घनफूट (४९ टक्के) जलसाठा झाला आहे. चणकापूर व अर्जुनसागर प्रकल्पाचे गेट उघडे असल्याने गिरणा व पुनंद नदीपात्रात हजारो क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गिरणा, पुनंद तसेच बेहडी नदी खळखळून वाहू लागली आहे.चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून, हवामान खात्याने येत्या काही दिवसांत पुन्हा पावसाचे संकेत दिले आहेत. कळवण शहर व तालुक्यात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे चांगला पाऊस पडल्याने शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसाने बळीराजाला दिलासा मिळाला असून, कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचले असून, बांध फुटले आहे, तर रस्ते उखडून गेल्याने रस्त्यांना खड्डे पडले आहेत. १५ आॅगस्टपर्यंत चणकापूरसह अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पाचे गेट उघडे राहणार असल्याने पावसाचे पूरपाणी शेकडो क्यूसेसने नदीपात्रातून वाहत असल्याने पूरपाण्यामुळे नदीपात्रालगत असलेल्या गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून, महसूल प्रशासनाने नदीपात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्याने यंदा वरुणराजाची मेहेरबानी चांगली राहील अशी आशा सर्वांना होती. त्यावेळी तालुक्यात ५५ ते ६० टक्के पेरण्या झाल्या होत्या. मात्र पावसाने त्यानंतर दडी मारल्याने तालुक्यातील बळीराजा चिंतातुर झाला होता. मात्र तीन-चार दिवसांपासून तालुक्यात झालेल्या पावसामुळे बळीराजाला चांगलाच दिलासा मिळाला आहे. तसेच तालुक्यातील नदी-नाले खळखळून वाहू लागले आहेत.