शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांनी अभिनयकलेचे दर्शन घडवत मानवी प्रवृत्तीवर भाष्य केले,

By admin | Updated: December 28, 2014 01:53 IST

चिमुकल्यांनी अभिनयकलेचे दर्शन घडवत मानवी प्रवृत्तीवर भाष्य केले,

नाशिक : शहरातील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेत शनिवारी सादर झालेल्या पाच नाटकांतून चिमुकल्यांनी आपल्यातील अभिनयकलेचे दर्शन घडवत उपहास, विडंबनातून मानवी प्रवृत्तीवर भाष्य केले, तसेच एकतेचा संदेशही दिला. प्रारंभी जळगावच्या ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाने उज्ज्वला गाढे दिग्दर्शित ‘अंधेरनगरी’ नाटक सादर केले. दुसऱ्यांवर विसंबून राहणाऱ्या वेंधळ्या राजाची गोष्ट त्यातून सादर करण्यात आली. दर्शना रडे, प्राची पाटील, फाल्गुनी चौधरी, अश्विनी देवरे आदिंनी भूमिका साकारल्या. नाशिकच्या क्रांतिवीर मित्रमंडळाच्या वतीने ‘शेपटीचा साप’ हे सई परांजपे लिखित आणि राहुल मनोहर दिग्दर्शित नाटक सादर करण्यात आले. यात राजा-राणीच्या गोष्टीतून माणसाच्या वृत्तीवर विडंबनात्मक शैलीने प्रकाश टाकण्यात आला. सिद्धेश पराडकर, अंकिता दीक्षित, सिद्धांत आंबेकर, अमित थेटे, प्रबुद्ध मागाडे, वंदन वेलदे आदिंनी प्रमुख भूमिका केल्या. अहमदनगरच्या जामखेड येथील नवीन मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘वेताळ रिटर्न’ हे नाटक सादर केले. साक्षी काळदाते, शुभम वस्तारे, विठ्ठल पाटील, अनिकेत लाटगे आदिंनी भूमिका केल्या. अविनाश बोधले यांचे दिग्दर्शन होते. भुसावळच्या महाराणा प्रताप विद्यालयाने ‘वीर जवान अमर रहें’ या नाटकातून एकतेचा संदेश दिला. नारायण घोडके दिग्दर्शित या नाटकात नंदकिशोर गोसावी, अभिजित सोनवणे, प्रतीक मुळे, सार्थक जाधव, प्रीतेश वरखेडे आदिंनी भूमिका केल्या. जुन्या सिडकोतील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयाने प्रशांत दळवी लिखित ‘दे दणादण’ या नाटकातून खेळाच्या मैदानासाठी मुलांनी राजकीय नेत्यांशी केलेल्या संघर्षाचे चित्रण केले. दर्शन उशीरे, ऋषभ निकम, निशांत देशपांडे, पूजा पाटील, यश ढाके, वैष्णवी मुर्तडक यांनी प्रमुख भूमिका केल्या. दिग्दर्शन डॉ. प्रशांत वाघ यांचे होते. (प्रतिनिधी)