शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटात दाम्पत्यासह मुले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:21 IST

एकलहरारोड संभाजीनगर भोरमळ्यात भाडेतत्त्वावरील खोलीत राहणाऱ्या नरसिंग कांबळे यांच्या घरी शुक्रवारी पहाटे गॅस गळती होऊन स्फोट झाला. या स्फोटात पती-पत्नीसह तीन लहान मुले भाजून गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाशिकरोड : एकलहरारोड संभाजीनगर भोरमळ्यात भाडेतत्त्वावरील खोलीत राहणाऱ्या नरसिंग कांबळे यांच्या घरी शुक्रवारी पहाटे गॅस गळती होऊन स्फोट झाला. या स्फोटात पती-पत्नीसह तीन लहान मुले भाजून गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.एकलहरारोड ट्रॅक्शनसमोर संभाजीनगर येथील भोरमळ्यात कृष्णा पंडित यांच्या समोरासमोर सहा छोट्या खोल्या आहेत. तीन खोल्या रिकाम्या असून, एका खोलीत स्वत: मालक कृष्णा पंडित राहतात. तर भाडेतत्त्वावर एका खोलीत सेन्ट्रिंग काम करणारे नरसिंग रंगनाथ कांबळे (४४), पत्नी नम्रता (४०), मुलगा निखिल (६), मुलगी नेहा (४), अथर्व (३) राहतात. तर दुसºया खोलीत भाड्यातत्त्वावर मुस्लीम कुटुंबीय राहण्यास असून, गेल्या १० दिवसांपासून ते बाहेरगावी गेले आहेत.नम्रता कांबळे या पहाटे ५ च्या सुमारास उठून मुलांची शाळा सुरू झाल्याने व पतीला कामावर जायचे असल्याने स्वयंपाकाची तयारी करत होत्या. पीठ मळून झाल्यानंतर पाणी गरम करण्यासाठी त्यांनी गॅस शेगडी काड्यापेटीने पेटविण्याचा प्रयत्न करताच रेग्युलेटरमधून गळती होऊन खोलीत पसरलेल्या गॅसने पेट घेतल्याने मोठा आवाज झाला. यामुळे आजूबाजूचे झोपलेले नागरिक जागे झाले. मात्र खोलीत गळती झालेल्या गॅसचा स्फोट झाल्याने नम्रता कांबळे या संपूर्ण भाजून गंभीर जखमी झाल्या. तर खोलीत झोपलेले पती नरसिंग, मुले निखिल, नेहा, अथर्व हे गॅसच्या भडक्याने व कपड्याला आग लागून तेही जखमी झाले. स्फोटात छताचा पत्रा फाटला असून, भिंतींना तडे व खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. तर स्फोटामुळे आग लागल्याने जखमींच्या अंगावरील कपडे, गादी आदी जळाले आहेत. स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचे नागरिक जागे होऊन घटनास्थळी धावत आले.तर तेथुन जवळच राहाणारा जखमी नम्रता यांचा भाऊ नितीन भीमराव सूर्यवंशी यांने लागलीच एका खाजगी वाहनातून पाचही जखमींना बिटको रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅस गळती होऊन झालेला स्फोट व लागलेली आग यामध्ये नम्रता ७० टक्के, नरसिंग ४० टक्के, अथर्व २५ टक्के, नेहा ३५ टक्के, निखिल १५ टक्के भाजला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.गॅस गळतीची दुर्घटना टळली असती...कांबळे यांच्या घरात गॅस सिलिंडरच्या रेग्युलेटरमधून दोन-तीन दिवसांपासून गॅस गळती होत असल्याचे आजूबाजूच्या रहिवाशांनी सांगितले. तसेच जखमी नम्रताने भाऊ नितीन यालादेखील घटना घडल्यानंतर सांगितले. जखमी नम्रता या गंगापूर रोडवरील सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूलमध्ये लहान मुलांना सांभाळण्याचे काम करतात. गॅस गळतीबाबत नम्रता या शुक्रवारी संबंधित गॅस एजन्सीच्या दुकानात गॅस गळतीबाबत सांगण्यास जाणार असल्याचे भाऊ नितीन याने सांगितले. मात्र पहाटेच सदरची दुर्दैवी घटना घडली.

टॅग्स :NashikनाशिकBlastस्फोट