केमिस्ट असोसिएशन; गुरुवारी मेळावा

By Admin | Updated: August 5, 2014 01:52 IST2014-08-05T01:32:07+5:302014-08-05T01:52:50+5:30

केमिस्ट असोसिएशन; गुरुवारी मेळावा

Chemist Association; Thursday rally | केमिस्ट असोसिएशन; गुरुवारी मेळावा

केमिस्ट असोसिएशन; गुरुवारी मेळावा

 

नाशिक : केमिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील केमिस्टचा महामेळावा गुरुवारी (दि़ ७) होणार असल्याची माहिती अध्यक्ष मयूर अलई, राज्य केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे गोरख चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली़
गुरुवारी दुपारी अडीच वाजता सिडकोतील भोळे मंगल कार्यालय येथे हा मेळावा होणार आहे़ केमिस्ट बांधवांच्या विविध समस्या जाणून घेणे, शासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कारवाई व अन्यायाविरोधात यावेळी चर्चा करण्यात येणार आहे़ तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत संघटनेने घ्यायच्या निर्णयाबाबत चर्चा होणार आहे़ या मेळाव्यात महाराष्ट्र केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अनिल नावंदर, विनय श्रॉफ हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत़
पत्रकार परिषदेला केमिस्ट असोसिएशनचे योगेश ब्रह्मेचा, रत्नाकर वाणी, अतुल अहिरे, गिरीश महाजन, योगेश कदम, मनोज लोढा, महिंद्र अमृतकर, हिरालाल पाटील, अतुल अहिरे, दीपक जाधव, प्रशांत पवार आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Chemist Association; Thursday rally