शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

चीट फंड कंपन्यांकडे राज्य शासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

By admin | Updated: July 29, 2014 00:56 IST

किरीट सोेमय्या : केबीसीबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा

 नाशिक : केबीसीबरोबरच चीट फं ड कंपन्यांमध्ये राज्यातील दहा लाख नागरिकांनी ५० हजार कोटींपेक्षा अधिक पैसे गुंतवले आहेत़ अशा ४१ चीट फं ड कंपन्यांची यादी व अहवाल आपण मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांना दिला आहे़ परंतु त्याबाबत राज्य शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्र हा चीट फंड कंपन्यांचा बालेकिल्ला झाला असल्याचा आरोप भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी येथे केला़केबीसी फसवणूक प्रकरणी किरीट सोमय्या यांनी नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेऊन माहिती घेतली़ यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ चीट फंड कंपन्यांबाबत आपण राज्य शासनाला उच्च न्यायालय तसेच सीबीआयचा अहवाल दिला होता़ मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांशी बोलूनही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. केबीसीमध्ये हजारो नागरिकांची फ सवणूक झाली आहे़ यातील सर्व गुंतवणूकदारांचे संरक्षण व पैसे परत मिळवून देण्याचे आपले मुख्य उद्दिष्ट आहे़ केबीसी प्रकरणावर नाशिक पोलिसांनी चांगली पकड घेतली आहे़ या कंपनीतील अनेक मुख्य मोहरे जेरबंद करण्यात त्यांना यश आले आहे़ उर्वरितांचा सहभाग निष्पन्न झाल्यावर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे़ आयुक्तांशी चर्चा करून आतापर्यंतच्या कारवाईचा आढावा घेतला.परदेशातील आरोपी पकडण्याबाबत जी काही मदत लागेल त्यासाठी आपण केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नाशिक पोलिसांनी अगोदर माहिती मिळूनही यामध्ये हलगर्जीपणा केला असे वाटते का, असे विचारले असता ‘देर आये दुरुस्त आये’ म्हणत हा विषय त्यांनी टाळला़याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष सुहास फ रांदे, विजय साने, नगरसेवक देवयानी फरांदे, सीमा हिरे, सुरेश पाटील, गोपाळ पाटील यांसह केबीसी गुंतवणूकदार उपस्थित होते़ (प्रतिनिधी)