शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

चाळीतील शिल्लक कांद्याला मोड

By admin | Updated: November 15, 2016 00:16 IST

चाळीतील शिल्लक कांद्याला मोड

 निफाड : यंदा भाव पडल्याने उत्पादक हवालदिलनिफाड : यंदा कवडीमोल भाव मिळाल्याने उन्हाळी कांद्याने उत्पादकांना रडवले आहे. चांगला भाव मिळेल या आशेने चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यालाही कांद्याना मोड यायला लागल्याने कांदा उत्पादकांचे धाबे दणाणले आहे.यावर्षी तालुक्यात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने भाव घसरले आहेत. आज ना उद्या चांगला भाव मिळेल या आशेने काही शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीत साठवून ठेवला होता. परंतु सरकारने नियमनमुक्तीचा नियम लागू केल्याने बाजार समित्यांनी या नियमास विरोध करीत जवळ जवळ दोन महिने बाजार समित्या बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे सर्व कांदा चाळीमध्ये तसाच पडून राहिला. उन्हाळा, बेसुमार पाऊस यामुळे चाळीतील बराच कांदा सडून गेला. त्यात लिलाव चालू झाल्यानंतर कांद्याला २०० ते ७०० रुपये इतका कमी भाव मिळत असल्याने यात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडून पडले आहे. दिवाळीतील सुटीनंतर बाजार समित्यांमधील लिलाव सुरू झाले. परंतु कांद्याचे भाव ७०० च्या वर गेले नाही. कांद्याला सरासरी फक्त ५०० रूपये भाव मिळाला. सद्य स्थितीत बराच कांदा चाळीत तसच पडून आहे. त्यातील बराच कांदा उन्हाळ्यात खराब झालेला असताना उर्वरित कांद्याला अतिथंडीमुळे मोठ्या प्रमाणात मोड येण्यास सुरुवात झाली आहे. ६० टक्के कांदा खराब झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक होणार असून, कांदा उत्पादकांचे यावर्षीचेही आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. तालुक्यातील राजकीय नेते आपला वाढदिवस मोठा खर्च करून साजरे करताना दिसत आहे. परंतु कांद्याच्या कोसळलेल्या भावांमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू असताना कांदा प्रश्नावर आंदोलन करायला ना या राजकीय नेत्यांना वेळ आहे, ना शेतकरी संघटनांना. सर्वच शेतकरी अस्वस्थ आहे. (वार्ताहर)