बदलत्या हवामानात कांदा रोपासह लागवड कांद्यावर अरिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 05:32 PM2019-12-07T17:32:20+5:302019-12-07T17:33:31+5:30

देशमाने : सततच्या बदलत्या हवामानामुळे कांद्याची रोपे तर कुजलीच पण आता लागवड केलेल्या कांद्याचीही तीच गत होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

In the changing weather, onions are planted with onion seedlings | बदलत्या हवामानात कांदा रोपासह लागवड कांद्यावर अरिष्ट

देशमाने परिसरात दूषित वातावरणातून हाती पडलेल्या कांदा रोपांची सुरू असलेली लागवड.

googlenewsNext
ठळक मुद्देबुरशी व मावा रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांदा रोपे, लागवड झालेल्या कांद्यावर विपरीत परिणाम

देशमाने : सततच्या बदलत्या हवामानामुळे कांद्याची रोपे तर कुजलीच पण आता लागवड केलेल्या कांद्याचीही तीच गत होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
चार-चार वेळेस कांद्याची रोपे टाकली. परंतु एकही शेतकऱ्यांची अपेक्षित कांदा लागवड झाली नाही. त्यात देखील समाधान मानत लागवड झालेला कांदा वाचिवण्यासाठी धडपड करताना शेतकरी वर्ग दिसत आहे.
दिवसागणकि हवामानात सातत्याने बदल होत आहे. याचा अनिष्ट परिणाम कांदा पिकांवर होत आहे. हवेत वाढलेली आद्रता, जमिनीतील कमी न होणारा ओलावा व ढगाळ वातावरण यामुळे बुरशी व मावा रोगाचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने जमिनीत मुळांची वाढ खुंटून सकाळच्या वेळेत पडणार्या दवामुळे पाने पिवळी पडून करपत आहे. यावर सुचिवलेले उपाय व महागड्या औषधे फवारून देखील परिणाम होत नसल्याने अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी काळात येणार्या कांद्याचे प्रमाण कमी होऊन कांद्याचा तुडवडा कायम भासेल असी भीती व्यक्त होत आहे.
कांद्याचे अल्प उत्पादनामुळे व वाढलेल्या बाजारभावामुळे शेतकरी कांदा पिकांची अधिक काळजी , परिश्रम घेतानाचे चित्र परिसरात दिसत आहे. मात्र हवामान असेच बदलते राहिल्यास त्याचा कांदा उत्पादन वाढीवर अनिष्ट परिणाम होऊन कांदा टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
" परतीचा जोरदार व प्रदीर्घ चाललेला पाऊस यामुळे ही परिस्थिती सगळीकडेच ओढावली आहे. बुरशी व मावा रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांदा रोपे, लागवड झालेल्या कांद्यावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे पिकाची वाढ खुंटून कांद्याची प्रतवारी ढासळून उत्पादन घटणार आहे.
अंतू काळे, शेतकरी, देशमाने.
 

Web Title: In the changing weather, onions are planted with onion seedlings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.