शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

नाव बदलणे आता झाले सोपे

By admin | Updated: July 28, 2014 23:29 IST

नाव बदलणे आता झाले सोपे

 

विंचूर : नावात काय आहे असे शेक्सपिअर म्हणून गेला आहे. पण हे म्हणताना शेक्सपिअरचे नाव मात्र घ्यावेच लागते. सर्वसाधारणत: विवाहानंतर नाव बदलले जाते. मात्र प्रॉपर्टीसाठी, अंकशास्त्राच्या नियमाप्रमाणे किंवा नाव आवडत नाही म्हणून नाव बदलणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. नाव, आडनाव, आणि धर्म बदलण्याच्या पूर्वीच्या किचकट आणि वेळखाऊ पद्धतीत आता बदल करण्यात आला असून, सदर प्रक्रिया आॅनलाइन करण्यात आली आहे. नाव बदलण्याबाबतच्या जाहिराती शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठीची छापील अर्जाची पद्धत संपुष्टात आली असून, आॅनलाइन पद्धतीमुळे हा त्रास निश्चितपणे कमी होणार असल्याने नाव कट करण्याची कटकट कमी होणार आहे.मुद्रण व लेखनसामग्री संचालनालयामार्फत साधारण व असाधारण अशा ३२ प्रकारचे राजपत्र छपाई करून प्रसिद्ध केली जातात. त्यापैकी नागरिकांना नाव, धर्म व जन्मतारीख बदलाबाबतचे जाहिरातीचे राजपत्र भाग दोनमध्ये छपाई केली जाते. त्यासाठी नागरिकांना संचालनालयाच्या खिडकीवर रांग लावून अर्ज प्राप्त करुन अर्ज भरुन सादर करावे लागत होते. शासन राजपत्रही आॅनलाइन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. लग्न झाल्यावर नाव बदलणे किंवा दाखल्यावरील जन्मतारीख बदलणे यासाठी शासकीय मुद्रण व लेखनसामग्री संचालनालयात जाऊन अर्ज करावा लागतो. शासनपत्रात ते प्रसिद्ध करून घेण्याची पद्धत होती. ही प्रक्रिया वेळखाऊ व किचकट होती. मात्र ही प्रक्रिया यापुढे आता आॅनलाइन पद्धतीने राहणार असून, त्यासाठीचे शुल्कदेखील आॅनलाइन पद्धतीने भरण्याची सोय शासनाने करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेता यावा म्हणून अर्ज भरताना पासपोर्ट, वाहनचालक परवाना, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड यापैकी कुठल्याही एकाची प्रत स्कॅन करून जोडावी लागणार आहे.(वार्ताहर)