शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यात परिवर्तन

By admin | Updated: February 24, 2017 23:56 IST

शिवसेनेची ताकद वाढली : कॉँग्रेस-राष्ट्रवादीला दणका

सुनील शिंदे : घोटीइगतपुरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अनपेक्षितपणे निकाल लागले असून, या निकालात जिल्हा परिषदेच्या तीन गटात आणि पंचायत समितीच्या सात गणात शिवसेनेने बाजी मारल्याने तालुक्यात पुन्हा एकदा शिवसेनेची ताकद वाढल्याचे स्पष्ट होत आहे. निवडणुकीच्या पूर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होऊन इतर पक्षातील मातब्बर शिवसेनेत दाखल झाल्याने सेनेला घवघवीत यश मिळाल्याचे बोलले जाते.  मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या एकही गटात शिवसेनेला यश आले नव्हते.तर पंचायत समितीच्या दहा गणांपैकी शिवसेनेला एकही जागा न मिळता, मित्रपक्षाच्या विजयावर समाधान मानावे लागले होते.मात्र या निवडणुकीत शिवसेनेने प्रचंड मुसंडी मारीत तब्बल तीन गट ताब्यात घेतले आहेत तर गणातही सात जागा जिंकून पंचायत समतिी वर एकहाती सत्ता आणली आहे.  घोटी गटातील पारंपरिक लढतीत पुन्हा एकदा राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.तर नांदगाव सदो गटातील काँग्रेसचे वर्चस्व शिवसेनेने मोडीत काढीत हा गट पुन्हा आपल्या ताब्यात घेतला आहे.,तर वाडीव-हे गटात काँग्रेसने पुन्हा एकदा बाजी मारून हा एकमेव गट राखला आहे.तर शिरसाटे या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला शिवसेनेने सुरु ंग लावून या गटात विजय मिळविला आहे.या गटात माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांची प्रतिष्टा पणाला लागल्याने तालुक्याचे लक्ष या गटाकडे लागले होते.पंचायत समितीवर एकहाती सत्तामागील निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी प्रत्येकी तीन, दोन मनसे एक आरपीआय आणि एक अपक्ष असे पक्षीय बलाबल असलेल्या इगतपुरी पंचायत समितीत या निवडणुकीत परिवर्तन घडविले आहे. यात तब्बल सात जागा शिवसेनेने ताब्यात घेतल्या तर राष्ट्रवादी,काँग्रेस, भाजपला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. मनसेला मात्र खातेही उघडता आले नाही.इगतपुरी तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या आमदार असल्याने या निवडणुकीत काँग्रेस पक्ष अपेक्षित यश मिळवेल अशी अपेक्षा असताना मात्र काँग्रेसला तालुक्यातील मतदारांनी सपशेलपणे नाकारले आहे.वाडीव-हे गटात आमदारकन्येला काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्याने सर्व ताकद काँग्रेस पक्षाने या गटातच खर्ची केली.