शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

चंदनपुरी यात्रोत्सवास प्रारंभ

By admin | Updated: January 23, 2016 22:33 IST

मालेगाव : यळकोट यळकोट जय मल्हार

मालेगाव कॅम्प : मालेगाव तालुक्यातील प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे खंडोबारायाची यात्रा शनिवारी मोठ्या उत्साहात सुरू झाली. सकाळी खंडोबा मंदिरात सहकार राज्यमंत्री दादा भुसे, अनिता भुसे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. राज्यभरात ग्रामदेवता खंडोबा मल्हार भक्ताचे श्रद्धास्थान आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदादेखील पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर यात्रेस प्रारंभ झाला. यासाठी शुक्रवारी जेजुरी येथून पायी मशाल ज्योत मल्हार भक्तांनी चंदनपुरीमध्ये आणली. चंदनपुरीत ज्योतीसह खंडोबाच्या मुखवट्यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत खोबरे व मोठ्या प्रमाणावर भंडारा उधळला गेला. यामुळे चंदनपुरी गावात पिवळी सोनेरी किनार प्राप्त झाली होती. यात्रेनिमित्त खंडोबा मंदिर व परिसरात सजावट, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करण्यात आली. संशयित हालचाली टिपण्यासाठी चार सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत. यात्रेत पूजेच्या वस्तू, भंडारा, खोबरे या साहित्यांसह शंभरहून अधिक दुकाने, हॉटेल थाटण्यात आले आहेत. चारशेहून अधिक मनोरंजनाचे व खेळण्यांची दुकाने लावण्यात आली आहेत. पंधरा दिवस सुुरू राहणार असलेल्या यात्रेत दहा ते बारा लाख मल्हार भक्तांची दर्शनासाठी गर्दी होणार आहे. याप्रसंगी चंदनपुरीच्या सरपंच कु. योगीता अहिरे, उपसरपंच कु. केतकी पाटील यांच्यासह माजी सरपंच राजेंद्र पाटील, मा. पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, कॉँग्रेस नेते प्रसाद हिरेंसह ग्रामपंचायत सदस्य व असंख्य नागरिक व मल्हार भक्त उपस्थित होते. (वार्ताहर)