शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाडी ठेक्याचा पेच वाढण्याची शक्यता

By admin | Updated: January 7, 2016 23:54 IST

मुदतवाढही संपली : प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

नाशिक : सद्यस्थितीतील घंटागाडी ठेकेदारांना देण्यात आलेली महिनाभराची मुदतवाढ दि. ८ जानेवारीला संपुष्टात येत असून, प्रशासनाकडून पुन्हा एकदा मुदतवाढीचा प्रस्ताव स्थायीवर ठेवला जाणार आहे. मात्र, स्थायी समितीकडून मुदतवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावण्याची शक्यता असल्याने प्रशासनापुढील पेच वाढणार आहे. महासभेने घंटागाडीचा ठेका पाच वर्षांसाठी देण्याचा ठराव मंजूर करत तो प्रशासनाकडे अंमलबजावणीसाठी पाठविला आहे; परंतु आमदार देवयानी फरांदे यांनी सदर ठरावावर आक्षेप घेत राज्य शासनाकडे तक्रार केल्याने ठेक्याची निविदाप्रक्रिया रखडली आहे. महापालिकेने त्यासंबंधीचा अहवाल शासनाकडे पाठविला; परंतु अद्याप शासनाकडून त्याबाबत निर्णय न आल्याने घंटागाडीसारखा आरोग्याशी निगडित विषय प्रलंबित आहे. त्यातच, सद्यस्थितीतील घंटागाडी ठेकेदारांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मागील सभेत मांडण्यात आला असता, स्थायी समितीने केवळ महिनाभरासाठीच ठेका देण्याचा ठराव केला आणि घंटागाडीची नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. यापुढील काळात कोणत्याही परिस्थितीत सद्यस्थितीतील ठेकेदारांना मुदतवाढ दिली जाणार नाही, असे सभापतींनी निक्षून सांगितले होते. दरम्यान, स्थायी समितीने दिलेली एक महिन्याची मुदतवाढ दि. ८ जानेवारीला संपुष्टात येत असून प्रशासनाकडून पुन्हा एकदा मुदतवाढीचा प्रस्ताव स्थायीवर ठेवला जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. परंतु, सद्यस्थितीतील ठेकेदारांना महापालिकेने घंटागाडी कामगारांना सुधारित किमान वेतन दिले नाही म्हणून काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे काळ्या यादीतील ठेकेदारांना मुदतवाढ कशी द्यायची, असा एक प्रश्न स्थायी समितीसमोर निर्माण झाला आहे. स्थायीने मुदतवाढीचा प्रस्ताव नाकारल्यास प्रशासनापुढील पेच वाढणार आहे. (प्रतिनिधी)