शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीचे आव्हान

By admin | Updated: March 3, 2015 00:34 IST

उद्दिष्टपूर्तीसाठी धावपळ : फेब्रुवारीअखेर ९६ कोटींची वसुली, थकबाकीदारांना वॉरंट

नाशिक : मार्चअखेरपर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेच्या करविभागाची आता धावपळ सुरू झाली असून, ७३ हजार मिळकतधारकांना सूचनापत्र पाठविण्यात आले आहे. फेब्रुवारीअखेर ६३ कोटी रुपये घरपट्टी, तर ३३ कोटी रुपये पाणीपट्टीची वसुली झाली आहे. चालू आर्थिक वर्ष संपायला आता अवघे २८ दिवस उरले असताना पालिकेला घरपट्टी-पाणीपट्टीचे निम्मेच उद्दिष्ट गाठता आले आहे. दरम्यान, थकबाकीदार १७९६ मिळकतधारकांना जप्तीचे वॉरंट बजावण्यात आल्याचे करविभागाकडून सांगण्यात आले. महापालिकेने आर्थिक परिस्थितीत सुधारणेकरिता घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीकडे लक्ष केंद्रित केले असून, २८ फेब्रुवारीअखेर ६३ कोटी ३० लाख रुपये घरपट्टीची वसुली झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत त्यात तीन कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. पूर्व व पंचवटी विभागात मात्र वसुली समाधानकारक झालेली नाही. महापालिकेने सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी ११५ कोटींचे घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. चालू मागणीच्या तुलनेत ६४ टक्के वसुली झालेली आहे. सर्वसाधारणपणे मार्चअखेरपर्यंत ८० कोटी रुपयांपर्यंत घरपट्टीची वसुली होण्याची शक्यता करविभागाकडून व्यक्त केली जात आहे. मागील आर्थिक वर्षात ७० टक्के घरपट्टीची वसुली झाली होती, तर करविभागाने १०५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. आता मार्चअखेरपर्यंत उद्दिष्टानुसार सुमारे ५२ कोटी रुपये घरपट्टी वसुलीचे आव्हान करविभागापुढे असून, त्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत मुदतीत घरपट्टी न भरणाऱ्या ७३ हजार ४३० मिळकतधारकांना सूचनापत्र पाठविण्यात आले आहे. त्यातील १७ हजार १४३ मिळकतधारकांनी सूचनापत्र मिळाल्यानंतर करभरणा केलेला आहे. याशिवाय थकबाकीदार १७९६ मिळकतधारकांना वॉरंट बजावण्यात आले असून, त्यातील ६५० मिळकतधारकांनी १ कोटी ३ लाख रुपयांचा करभरणा केला आहे. थकबाकीदारांकडून पालिकेला ५ कोटी ६४ लाख रुपयांची वसुली अपेक्षित आहे. घरपट्टीबरोबरच पालिकेने पाणीपट्टी वसुलीकडेही लक्ष केंद्रित केले आहे. फेब्रुवारीअखेर ३३ कोटी १७ लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली असून, पालिकेने यावर्षी ७० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील वर्षी फेब्रुवारीअखेर २४ कोटी २९ लाख रुपयांची वसुली झाली होती. यंदा त्यात ९ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी दोन्ही मिळून सुमारे ९६ कोटी रुपयांची वसुली केली असून, उद्दिष्टानुसार आणखी ९० कोटी रुपयांची वसुली मार्चअखेरपर्यंत करण्याचे आव्हान आहे. (प्रतिनिधी)