उपेक्षित कलावंतांचा सिडकोत सत्कार

By Admin | Updated: September 26, 2015 22:32 IST2015-09-26T22:30:59+5:302015-09-26T22:32:30+5:30

उपेक्षित कलावंतांचा सिडकोत सत्कार

Cedecot hospitality of neglected artists | उपेक्षित कलावंतांचा सिडकोत सत्कार

उपेक्षित कलावंतांचा सिडकोत सत्कार

नाशिक : दिवंगत संगीतकार रवींद्र गरुड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहरातील विविध कलावंतांचा सत्कार करण्यात आला. सिडकोत झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मोहन अढांगळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय गिते, राहुल तूपलोंढे, शरद शेजवळ, मुरलीधर रोकडे, प्रा. सचिन गरुड, सत्यभामा गरुड उपस्थित होते. दिवंगत रवींद्र गरुड यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ उपेक्षित कलावंतांना गौरव करण्याचा निर्णय घेतल्याचे नीलेश गरुड यांनी सांगितले. यावेळी शाहीर बाळासाहेब भगत, बाळासाहेब चव्हाणके, विनायक पठारे, रंगराज ढेंगळे, भीमराव पवार, दुष्यंत वाघ, जयपाल ढिवरे, अनिल लेहनार, गोकुळ लोखंडे, प्रवीण नेटावणे, पी. के. गायकवाड, अरुण रहाणे, संज्योती देवरे यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Cedecot hospitality of neglected artists