शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात २६५ ठिकाणी लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

By admin | Updated: September 10, 2016 01:21 IST

प्रकल्प समिती बैठक : महापालिकाही देणार निधी

नाशिक : वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यासाठी २६५ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, शहरातील अंतर्गत रस्ते, कॉलनी परिसर याठिकाणीही सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी महापालिकेकडून सूचना मागविण्यात आल्या असून महापालिकेने निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने कायमस्वरूपी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याकरिता सर्वेक्षण हाती घेतले असून, त्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची बैठक पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पोलीस उपआयुक्तांसह महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, सभागृहनेत्या सुरेखा भोसले, मनसेचे गटनेते अनिल मटाले, रिपाइंचे प्रकाश लोंढे आदि उपस्थित होते. यावेळी शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी २६५ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्याठिकाणी ६९६ कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली. महापालिकेने काही प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली असता महापौरांनी त्याची तयारी दर्शविली व अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद करण्याचे आश्वासित केले.