शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

दरच नसल्याने शेतातच सडतोय फ्लॉवर, कोबी, वांगी अन‌् टोमॅटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 01:19 IST

येवला / जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणजे कांदा. पण यावर्षी बुरशीजन्य रोगाने व पावसाने शेतकऱ्यांची कांदा रोपे खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो ही पिके घेतली. गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत असून, अनेक शेतकऱ्यांनी पिके शेतातच सोडून दिली आहे. या पिकांतून खर्चदेखील वसूल होत नसल्याने भाजीपाला पाळीव जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देशेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

येवला / जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणजे कांदा. पण यावर्षी बुरशीजन्य रोगाने व पावसाने शेतकऱ्यांची कांदा रोपे खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो ही पिके घेतली. गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत असून, अनेक शेतकऱ्यांनी पिके शेतातच सोडून दिली आहे. या पिकांतून खर्चदेखील वसूल होत नसल्याने भाजीपाला पाळीव जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.जळगाव नेऊर परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचे रोपे नसल्यामुळे फ्लॉवर, वांगी, कोबी, टोमॅटो पिकाला पसंती दिली. परंतु त्याचेही उत्पादन जास्त झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनाभाजीपाला कवडीमोल दराने विक्री करावा लागत आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने त्याचा परिणाम भाजीपाला पिकावर होत आहे. बारमाही भाजीपाला उत्पादन घेऊन आपल्या प्रपंचाचा गाडा चालविणाऱ्या कुटुंबाचे जीवनमान अस्तव्यस्त झाले. हजारो रुपये भाजीपाल्यासाठी खर्च करून ती वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

कोरोनामुळे आठवडे बाजार बंद होण्याची भीतीकोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामीण भागातही आठवडे बाजार बंद ठेवण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यावर आधारित भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आपला भाजीपाला विक्री कसा करावा, हा प्रश्न उभा राहिला आहे. तोडून ठेवलेल्या भाजीपाल्याला मागणी नसल्यामुळे पाळीव जनावरांना खाऊ घालावा लागत आहे, तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतात सोडून दिला आहे. पर्यायाने भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, होत असलेल्या नुकसानीमुळे त्यांच्या प्रपंचाचा गाडा, कसा चालवावा व उधार, उसनवारी करून शेतीसाठी घेतलेला पैसा कसा फेडावा, असा प्रश्न भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.मी एक एकर क्षेत्रावर फ्लॉवरची दहा हजार काडी लागवड करून साधारणपणे रोपांसह एकरासाठी ३० हजार खर्च केला. गेल्या पंधरा दिवसांपासून फ्लॉवर चालू झाले आहे. त्यातून खर्चदेखील वसूल होत नसल्याने फ्लॉवर शेतातच सोडून देण्याची वेळ आली असून, हजारो रुपये खर्च वाया गेला आहे.- उत्तम सोनवणे, उत्पादक शेतकरी जऊळकेयेवला तालुक्यातील जऊळके येथील शेतकरी उत्तम सोनवणे यांनी शेतातच सोडून दिलेले फ्लॉवर पीक, दुसऱ्या छायाचित्रात जनावरांच्या पुढ्यात टाकलेली वांगी. (०१ जळगाव नेऊर १/२)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी