चेहडी परिसरात युवकाकडून गावठी कट्टा जप्त

By Admin | Updated: August 25, 2016 00:16 IST2016-08-25T00:15:46+5:302016-08-25T00:16:06+5:30

चेहडी परिसरात युवकाकडून गावठी कट्टा जप्त

Cattle seized from youth in Chhaddi area | चेहडी परिसरात युवकाकडून गावठी कट्टा जप्त

चेहडी परिसरात युवकाकडून गावठी कट्टा जप्त

नाशिकरोड : चेहेडी दारणा नदीकिनारी नाशिकरोड पोलिसांनी युवकांकडून सहा राउंडचा गावठी कट्टा जप्त केला आहे. परिसरात गावठी कट्टे मिळण्याचे प्रमाण वाढल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी चेहेडी दारणा नदीकिनारी मंगळवारी रात्री सापळा रचला होता. यावेळी संशयित प्रदीप सोमनाथ ढेरिंगे (२५) रा. जाधव संकुल पळसे याला सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सहा राउंडचा गावठी कट्टा आढळून आला.
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित प्रदीप ढेरिंगे याला बुधवारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cattle seized from youth in Chhaddi area