घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 18:41 IST2018-09-04T18:39:57+5:302018-09-04T18:41:16+5:30
नाशिक : खिडकीतून हात घालत मुख्य दरवाजाची कडी उघडून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रकमेसह पन्नास हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना अंबड लिंक रोडवरील विराटनगरमध्ये सोेमवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास घडली़

घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरी
नाशिक : खिडकीतून हात घालत मुख्य दरवाजाची कडी उघडून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रकमेसह पन्नास हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना अंबड लिंक रोडवरील विराटनगरमध्ये सोेमवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विराटनगरमधील अंबिका संकुलात उमेश शर्मा कुटुंबीयांसह राहतात़ सोमवारी रात्री कुटुंबीयांसह ते घरात झोपलेले असताना साडेबारा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाला लागून असलेल्या खिडकीतून हात घालत दरवाजाची कडी उघडली. यानंतर घरात प्रवेश करून तीन हजार ५०० रुपयांची रोकड, १५ हजार २४७ रुपयांचे ५.१ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ११ हजार ७५० रुपयांच्या कानातील सोन्याच्या रिंगा, दहा हजार व सात हजार रुपयांचा प्रत्येकी एक मोबाइल असा ४७ हजार ४९७ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़