येवल्यात दोन दुचाकी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 18:55 IST2019-11-10T18:54:50+5:302019-11-10T18:55:27+5:30

येवला : शहरातील साळी गल्ली परिसरात एका घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकी पहाटे ३ वाजेच्या सुमारास जळाल्याची घटना घडली आहे.

 In case of two wheelers burnt | येवल्यात दोन दुचाकी जळून खाक

येवल्यात दोन दुचाकी जळून खाक

ठळक मुद्देपहाटे ३ वाजेच्या सुमारास या वाहनांना आग लागल्याने गाड्यांचे पूर्ण नुकसान झाले आहे.


येवला : शहरातील साळी गल्ली परिसरात एका घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकी पहाटे ३ वाजेच्या सुमारास जळाल्याची घटना घडली आहे.
येवला शहरातील साळी गल्ली परिसरातील हेमंत आसाराम तुपके यांच्या मालकीच्या हीरो कंपनीची प्लेझर (क्र . एमएच १५, एफडब्ल्यू ७०३५) व हीरो पॅॅशन एक्स्प्रो (नंबर नाही) हा दोन गाड्या घराबाहेर उभ्या केल्या होत्या; मात्र पहाटे ३ वाजेच्या सुमारास या वाहनांना आग लागल्याने गाड्यांचे पूर्ण नुकसान झाले आहे. याबाबत तुपके यांनी येवला शहर पोलिसात तक्र ार दाखल केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र पाटील करीत आहे.

फोटो : आगीत जळून खाक झालेल्या दुचाकी. (10 येवला टूव्हिलर)

Web Title:  In case of two wheelers burnt