घरफोडी: पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 17:56 IST2020-07-07T17:55:48+5:302020-07-07T17:56:04+5:30

नाशिक : जेलरोड येथे सात महिन्यापूर्वी झालेल्या घरफोडीतील पावणेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी सराईत चोरट्यांकडून जप्त केला आहे. जेलरोड येथे ...

Burglary: Property worth Rs 3 lakh confiscated | घरफोडी: पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

घरफोडी: पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : जेलरोड येथे सात महिन्यापूर्वी झालेल्या घरफोडीतील पावणेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी सराईत चोरट्यांकडून जप्त केला आहे.
जेलरोड येथे गेल्या 2 जानेवारी रोजी प्रशांत अशोक कळमकर यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे पावणे तीन लाखाचा ऐवज चोरीस गेला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास शेळके, पोलीस शिपाई विशाल पाटील हे जेलरोड परिसरात गस्त घालत असताना सराईत चोरटा अर्जुन गोरख धोत्रे एका भंगारचे दुकानात मिक्सरचे पार्ट विकत असताना दिसून आला. पोलिसांनी लागलीच धोत्रे यास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने 2 जानेवारी रोजी कळमकर यांच्या घरी घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी धोत्रे यांच्या घरातून डब्यात ठेवलेला पाच तोळ्याचा सोन्याचा पोहेहार, 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी व मिक्सर असा एकूण 2 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. संशयित धोत्रे यास नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: Burglary: Property worth Rs 3 lakh confiscated