शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दालनात ओतले गटारीचे पाणी

By admin | Updated: March 13, 2015 23:09 IST

महिलांचा रुद्रावतार : दूषित पाणीपुरवठ्यामुळे कार्यालयात घातला धुडगूस, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

नाशिक : पंचवटीतील फुलेनगर परिसरातील प्रभाग क्रमांक ९ मधील कालिकानगर भागात ड्रेनेज लाइन तुंबल्याने होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ फुलेनगरातील शेकडो महिलांनी शुक्रवारी पंचवटी विभागीय कार्यालयात धुडगूस घालत ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्याच्या दालनात गटारीचे पाणी ओतले. याशिवाय संतप्त महिलांनी कार्यालयातील टेबल-खुर्च्यांचीही उलथापालथ करत खिडक्यांच्या काचा फोडल्या. याचवेळी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीचा प्रकार घडल्यानंतर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली आणि तातडीने कार्यालयात धाव घेत त्यांनी दिलेल्या उपाययोजनेच्या आश्वासनानंतर महिलांचा रागाचा पारा खाली आला. प्रभाग क्रमांक ९ मधील काही घरांमध्ये शौचालयाचे दुर्गंधीयुक्त पाणी तुंबल्याने तसेच नळाला अत्यंत दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी स्थानिक नगरसेवक डॉ. विशाल घोलप यांच्याकडे केली होती. त्यानुसार घोलप यांनीही संबंधित विभागाकडे तक्रारीचा पाठपुरावा केला; परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. शुक्रवारी फुलेनगर परिसरातील महिलांनी पुन्हा एकदा घोलप यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दूषित पाण्यासंबंधी गाऱ्हाणे मांडले. यावेळी घोलप यांच्यासह सर्व महिलांनी पंचवटी विभागीय कार्यालय गाठले; परंतु संबंधित अधिकारी जागेवर नसल्याचे लक्षात येताच महिलांचा संताप अनावर झाला. महिलांनी थेट संबंधित अधिकाऱ्याच्या दालनाकडे धाव घेत आपल्या सोबत बादली भरून आणलेले ड्रेनेजमधील घाण पाणी कार्यालयात ओतले. याचवेळी संतप्त महिलांनी कार्यालयातील टेबलखुर्च्यांचीही उलथापालथ करत खिडक्यांच्या काचा फोडल्या. शिवाय तेथे उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्याही अंगावर गटारीचे पाणी फेकत त्यांना धक्काबुक्की केली. विभागीय कार्यालयात अचानक उडालेल्या या गोंधळामुळे सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली व पळापळ सुरू झाली. तणावाचे वातावरण निर्माण झाले. लागलीच पोलिसांना खबर केल्यानंतर पोलीस बळ दाखल झाले. मात्र, पोलिसांना बोलाविण्यात आल्याचाही राग महिलांनी व्यक्त केला आणि महापालिका कर्मचाऱ्यांना धमकावणे सुरूकेले. दरम्यान, महिलांसोबत आलेल्या नगरसेवक विशाल घोलप यांनी महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलांनी कार्यालय आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले. विभागीय कार्यालयात महिलांचा मोर्चा आल्याचे व गोंधळ सुरू असल्याचे समजताच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण व विभागीय अधिकारी अ‍े. पी. वाघ यांनी कार्यालयात धाव घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी डॉ. घोलप व संतप्त महिलांशी चर्चा करून पाहणीदौऱ्यानंतर तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले आणि संतप्त महिलांचा जमाव शांत झाला. (प्रतिनिधी)