शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

दोघे ताब्यात : पोलीस, सुरक्षा रक्षकांची सावधानता

By admin | Updated: November 13, 2014 23:54 IST

व्यापाऱ्याचे लाखो रुपये चोरण्याचा प्रयत्न फसला

नांदगाव : आज आठवडे बाजाराच्या गर्दीची संधी साधून बँकेतून काढलेली १५ लक्ष रु. ची रोख रक्कम पळविण्याचा प्रयत्न गस्त पोलीस व बँकेचा सुरक्षारक्षक यांच्या प्रसंगावधानामुळे फसला. रककम पळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा अल्पवयीनांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यात एक मुलगी आहे व त्यांची वय वर्षे अवघी नऊ व दहा अशी आहेत. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र चोरी करण्याचा प्रयत्न केला म्हणून कालूगा सिसोदिया (वय ९) व जानकी सिसोदिया (वय १०) या दोघा बहिण भावास पोलीसांनी ताब्यात घेतले असून बालसुधारगृहात त्यांची रवानगी करण्यात येत आहे. ते मध्यप्रदेशातील रायगड जिल्ह्यातील नरसिंहगड तालुक्यातल्या ग्रामीण भागातले रहिवासी असल्याचे सांगतात. ते हिंदी बोल बोलतात. तसेच ‘हमारी मम्मी गुम हो गई है’ असा बनाव पोलीसांकडे करत आहेत.येथील एक व्यापारी स्टेट बँकेत रक्कम काढायला गेले असता कालूगा व जानकी दोघांना तिथे घुटमळतांना बघून सुरक्षा रक्षक निवृत्ती शिंदे यास संशय आला. दरम्यान रक्कम घेऊन स्कूटरवरुन निघालेल्या व्यापाऱ्याच्या मागे अंतर ठेवून वेगाने निघालेल्या मुलांची हालचाल बँकेजवळ गुप्तपणे गस्त घालणाऱ्या चाणाक्ष नजरेच्या प्रणय इंगळे (पोलीस) यांच्या डोळ्यातून सुटली नाही. स्कूटरकडे झेपावणाऱ्या मुलास हटकण्यासाठी ते पुढे सरसावले. दरम्यान शिंदे यांना त्यांनी मुलीला पकडण्यास सांगीतले. आता आपण पकडले जाणार म्हणून मुलाने बाजाराच्या दिशेने पळ काढला. पण इंगळे यांनी पाठलाग करुन त्याला ही पकडले. त्यानंतर दोघांची रवानगी पोलीस स्टेशनमध्ये झाली. पुढील तपास पोलीस निरिक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. सुमारे दीड वर्षे आधी अशाच अल्पवयीन मुलांना बँकेजवळ चोरीच्या प्रयत्नात असतांना पकडण्यात आले होते. ते देखील मध्यप्रदेशकडून आले होते.(वार्ताहर)