शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या अंध महिला क्रिकेट संघाने पटकाविला चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 15:06 IST

दि ब्लार्इंड वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अंध महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत गुजरातच्या संघाने विजेतेपद पटकाविले. तर मुंबईचा संघ उपविजेता ठरला. लीग पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत गुजरातसह विदर्भ आणि मुंबईचे संघ सहभागी झाले होते.

ठळक मुद्देमुंबईचा संघ उपविजेता ठरला; दुस ऱ्या क्रमांकासाठी झालेला सामनाच चुरशीचा गुजरातच्या कनस्या कौशल हिने उत्कृष्ठ कामगिरी

नाशिक : दि ब्लार्इंड वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अंध महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत गुजरातच्या संघाने विजेतेपद पटकाविले. तर मुंबईचा संघ उपविजेता ठरला.लीग पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत गुजरातसह विदर्भ आणि मुंबईचे संघ सहभागी झाले होते. पहिला सामना विदर्भ विरूद्ध गुजरात यांच्यात झाला.गुजरातने १२ षटकात ८ बाद १४८ धावा फटकाविल्या होत्या. परंतु विदर्भ संघाला या धावसंख्येचा पाठलाग करता आला नाही. गुजरातने विदर्भाला अवघ्या ७० धावांमध्ये रोखले. या सामन्यात गुजरातच्या कनस्या कौशल हिने उत्कृष्ठ कामगिरी केली.दुसरा सामना मुंबई व गुजरात यांच्यात झाला. मुंबई संघाला अवघ्या ५० धावा करता आल्या. गुजरातने अवघ्या ४ षटकातच सामना खिशात घातला. या दोन्ही सामन्यात विजयी मिळविल्याने गुजरात संघाला स्पर्धेचा विजेता घोषित करण्यात आले. दुसऱ्या क्रमांकासाठी मुंबई आणि विदर्भ यांच्यात सामना झाला हा सामना मुंबई संघाने जिंकला. दुस ऱ्या क्रमांकासाठी झालेला सामनाच चुरशीचा ठरला. विदर्भाने सर्व गड्यांच्या मोबसल्यात अवघ्या ३६ धावा केल्या तर मुंबईने ८ गड्यांच्या मोबदल्यात ३७ धावा केल्या. अखेरच्या क्षणापर्यंत हा सामना चुरशीचा झाला.चौधरी यात्रा कंपनीचे अजित बने चौधरी यांच्या हस्ते विजेत्या संघास रोख रक्कम आणि चषक प्रदान करण्यात आला. चौधरी यात्रा कंपनीने प्रत्येक चौकारासाठी रोख रकमेचे बक्षिस जाहिर केले होते. त्यानुसार खेळाडूंना देखील बक्षीसांचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी मानद अध्यक्ष कल्पना पांडे, महासचिव दत्ता पाटील, भगवान पवार, तेजस्विनी शेवाळे यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी अंध महिला मंगला धोंगडे यांना शिलाई मशीन तर प्रशांत जगताप यांना स्वयंरोजगारासाठी धनादेश देण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकCricketक्रिकेटSportsक्रीडा