शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवलेल्या  पाच शिक्षकांना बडतर्फीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:23 IST

महापालिकेच्या विविध खात्यांतील गैरव्यवहार किंवा अन्य प्रकार चर्चेचा विषय असला तरी शहरातील विविध शाळांमध्ये गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवलेल्या पाच शिक्षकांवरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ का करू नये, अशा प्रकारच्या अंतिम नोटिसा शिक्षण विभागाने सोमवारी (दि.९) बजावल्या आहेत. शिक्षण विभागात इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्याने शिक्षकांमध्येही खळबळ उडाली आहे.

नाशिक : महापालिकेच्या विविध खात्यांतील गैरव्यवहार किंवा अन्य प्रकार चर्चेचा विषय असला तरी शहरातील विविध शाळांमध्ये गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवलेल्या पाच शिक्षकांवरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ का करू नये, अशा प्रकारच्या अंतिम नोटिसा शिक्षण विभागाने सोमवारी (दि.९) बजावल्या आहेत. शिक्षण विभागात इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्याने शिक्षकांमध्येही खळबळ उडाली आहे.  विशेष म्हणजे आणखी तीन शिक्षकांची चौकशी अजूनही सुरू असून त्याबाबतदेखील लवकरच त्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.महापालिका शाळांमधील या शिक्षकांना गेल्या दोन ते तीन वर्षांत निलंबित करण्यात आले होते. मात्र चौकशी अधिकारी नसल्याने त्यांच्या चौकशी रखडल्या होत्या. मात्र मध्यंतरी बाबूराव हांगे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर त्याचा अहवाल महिनभरातच प्राप्त झाल्याने शिक्षण विभागाने अंतिम कारवाई सुरू करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने नोटीस बजावलेल्या आडगाव येथील मनपा शाळेतील शिक्षक मुरलीधर भोर यांच्यावर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप आहे. ज्ञानदेव पगार या सातपूर येथील शिक्षकाने अनेक नागरिकांना कर्ज काढून देतो तसेच स्कीममध्ये गुंतवणूक करणे यासारखी कामे करतानाच बॅँकांचे बनावट शिक्के तयार करून वापरल्याचा ठपका  आहे. लता महारू गरु ड या रजेवर असतानादेखील हजेरी पटावर स्वाक्षरी करत, वेतन काढून घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हिरामण बागुल यांना कळवण येथील अफरातफर प्रकरणात अटक झाली होती. या प्रकरणात त्यांना तीन दिवस कारागृहात काढावे लागले होते. शैला मानकर यांच्यावर दाखल्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे, असे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.अनेक शिक्षकांवर आरोप  शिक्षण विभागाच्या तीन शिक्षकांवरदेखील विविध आरोप असल्याने सध्या ते निलंबित असून, त्यांची चाकैशी सुरू आहे. यात मुख्याध्यापक जयश्री पंगुळवाडे यांनी बीएची बोगस पदवी सादर केल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे. विजय भोसले यांच्यावर शिष्यवृत्तीच्या रकमेचा अपहार, तर छाया गोसावी यांनी शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी लाच घेतल्याची तक्र ार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका