ठळक मुद्देनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार
मनमाड : पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या घराच्या अंगणात धरणे आंदोलन करून ममता बॅनर्जी यांचा धिक्कार केला.विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू झाला असून, अनेकांचे जीव गेले असल्याचा आरोप करीत बुधवारी (दि. ५) मनमाडला भाजप कार्यकर्त्यांनी आपापल्या घराच्या अंगणात धरणे आंदोलन केले. त्यात जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे, शहराध्यक्ष जय फुलवानी, नारायण पवार, सचिन संघवी, सचिन लुनावत, नीलकंठ त्रिभुवन, महेंद्र गायकवाड, आनंद बोथरा यांच्यासह इतर पदधिकारी व कार्यकर्त्यांनी भाग घेतला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}