शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

“आता जितेंद्र आव्हाड यांचा नंबर; लिस्टमधील १२वा खेळाडू!”; किरीट सोमय्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 4:23 PM

ठाकरे सरकारच्या डर्टी ११ नंतर १२ नंबर जितेंद्र आव्हाड यांचा लागणार असल्याचा मोठा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ठळक मुद्दे१२० कोटींच्या मालमत्ता जप्ती प्रकरणी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी ठाकरे सरकारच्या डर्टी ११ नंतर १२ नंबर जितेंद्र आव्हाड यांचा लागणारकिरीट सोमय्यांनी केला छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल

नाशिक: शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब तसेच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणावर छापा टाकत ईडीने कारवाई केली. इतकेच नव्हे तर अनिल परब यांना नोटीस बजावत उपस्थित राहण्यास सांगितले. अनिल परब यांनी १४ दिवसांची मुदत मागितली असून, या सर्व घटनांचे भाजपकडून स्वागत करण्यात आले आहे. १२० कोटींच्या मालमत्ता जप्ती प्रकरणी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. तसेच ठाकरे सरकारच्या डर्टी ११ नंतर १२ नंबर जितेंद्र आव्हाड यांचा लागणार असल्याचा मोठा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. (bjp kirit somaiya claims that now ncp jitendra awhad may next target of ed)

“थोडं थांबा... दिवाळीनंतर राज्यात आपलंच सरकार येणार आहे”; सुजय विखेंचा दावा

नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. भुजबळ ज्या नऊ मजली इमारतीत राहतात, त्या इमारतीशी तुमचा संबंध काय हे भुजबळांनी स्पष्ट करावे, अशी मागणी करत तुम्ही तुमच्या परिवारासोबत ज्या महालात राहता, तो महाल उभारण्यासाठी तुमच्याकडे पैसा कुठून आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी केले. 

“सत्ता मिळाल्यावर हिंदुत्वाची भूमिका बदलणाऱ्याची घंटा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही”; मनसेचा पलटवार

लिस्टमधला १२वा खेळाडू जितेंद्र आव्हाड!  

किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये येऊन आधी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईडीच्या लिस्टमधील १२वा खेळाडू कोण, असा प्रश्न किरीट सोमय्या यांना विचारण्यात आला. त्यावर लिस्टमधला १२वा खेळाडू जितेंद्र आव्हाड आहे, असे मोठे विधान सोमय्या यांनी केले. तसेच यावर अधिक बोलणे त्यांनी टाळले. त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“सत्तेच्या गैरवापराबाबत सुप्रिया सुळे यांनी वडिलांना विचारावं”; चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

आता भ्रष्ट नेत्यांना मंत्रिमंडळात कसं ठेवू शकता?

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जुन्या गोष्टीचे स्मरण करून देत, उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असताना ईडीने केलेल्या कारवाईच कौतुक केले होते. मग आता भ्रष्ट नेत्यांना मंत्रिमंडळात कसे ठेवू शकता?, असा सवाल केला. अनिल परब यांच्याविरोधात पहिली तक्रार मीच दिली होती. त्याची सुनावणी सुरू आहे. परब यांच्या मर्जीतील अधिकारी बजरंग खरमाटे यांचीही चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना लपवून ठेवले, असा टोलाही किरीट सोमय्या यांनी लगावला.

“घंटानाद करा, आणखी काही करा; पण आमचा नाद करू नका”; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

दरम्यान, कागदावर या नऊ मजली महालाचा मालक परवेझ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आहे. परवेझ कन्स्ट्रक्शनशी आपला संबंध काय? त्यांना तुम्ही भाडे देता की त्यांच्याकडून विकत घेतले आहे? परवेझ कंपनीसोबतच इतरही काही कंपन्यांची नावे घेत या कंपन्या बोगस असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. या कंपन्या चालवणाऱ्या लोकांना ईडीने अटक केली होती, आयकर विभागाने त्यांचे स्टेटमेंट घेतल्यावर त्यांनी सांगितले की, भुजबळांनी आम्हाला रोख पैसे दिले, ते आम्ही या कंपन्यांमध्ये टाकले, असे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे. छगन भुजबळ आपल्या परिवारासोबत ज्या घरात राहतात, ती इमारतही बेनामी असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी यावेळी बोलताना केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणKirit Somaiyaकिरीट सोमय्याJitendra Awhadजितेंद्र आव्हाडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसNashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळUddhav Thackerayउद्धव ठाकरे