शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 20:12 IST

बुलेट ट्रेन आमच्या माथी नको अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवताना याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे सांगून, राऊत यांनी राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून, पाच वर्षांत केवळ प्रसिद्धीसाठी इतका खर्च केला गेल्याने राज्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे.

ठळक मुद्देसंजय राऊत यांच्या वक्तव्याने पंकजा मुंढे संशयाच्या भोवऱ्यात बुलेट ट्रेनबाबतदेखील फेरविचार होऊ शकतो

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंढे यांच्या ट्विटरवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत असतानाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना राज्यातील सत्तांतरानंतर अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केल्याने मुंडे यांच्या सेना प्रवेशाची चर्चा रंगली आहे. आरेतील मेट्रो शेडच्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनबाबतदेखील फेरविचार होऊ शकतो, असे सांगून राऊत यांनी भाजपला आणखी एक धक्का दिला आहे.

बुलेट ट्रेन आमच्या माथी नको अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवताना याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे सांगून, राऊत यांनी राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून, पाच वर्षांत केवळ प्रसिद्धीसाठी इतका खर्च केला गेल्याने राज्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे. याबाबतीत सरकारच यावर बोलेल, मात्र बहुचर्चित बुलेट ट्रेनबाबत सरकार स्थापन होण्याआधीपासून आपण बुलेट ट्रेनचे ओझे आमच्या माथी नको ही आमची भूमिका आहे. हीच भूमिका शरद पवार यांनीही मांडली असल्याचेही राऊत म्हणाले. एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार हा अध्याय संपला असून, विधानसभेत १७० चा आकडा गाठण्यासाठी पवार मेहनत करत होते हे राज्याने पाहिले आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. राज्यातील मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री करतील असे सांगून, त्याबाबत तीन पक्षांमध्ये सूत्र ठरले आहे. विस्तार कधी करायचा हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असून, इतर पक्ष काय बोलतात याचा अधिकार त्यांच्याकडे नाही, असेही राऊत म्हणाले. पंकजा मुंडे यांच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले, पंकजा मुंडेच काय अनेक लोक सेनेच्या वाटेवर आहेत. पंकजा मुंडे यांनी १२ डिसेंबरला मेळावा बोलाविला आहे, त्यामुळे तेव्हाच त्यांची भूमिका कळेल, असे सांगून भाजपमध्ये असंतोष आहे का यावर मी काहीच बोलणार नाही, असेही संजय राऊत शेवटी यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNashikनाशिक