वणी : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्यात बिबट्याचा धुमाकुळ सुरु च असुन ठराविक कालावधीनंतर बिबट्याच्या हल्याच्या घटना घडत असुन हस्ते टाक्याचा पाडा रस्त्यावर मंगळवारी सकाळी सहा वाजता वृद्धावर बिबट्याने हल्ला केला आहे. हस्ते येथील दामोदर दगडु गायकवाड हे दुध घालण्यासाठी हस्ते टाक्याचा पाडा रस्त्यावरु न पायी जात असताना अचानकपणे बिबट्याने त्यांचेवर हल्ला केला. हल्यामुळे भितीने गाळण उडालेल्या गायकवाड यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. हल्यात डोके व हाताला गंभीर जखम झाल्याने त्यांना उपचारासाठी वणीच्या ग्रामिण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले आहे. परिसरातील दाट झाडे झुडपे हे बिबट्यांचे वास्तव्याचे ठिकाण झाले असुन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दिंडोरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:28 IST