Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातने शेतकऱ्याची १० कोटींची जमीन हडपली; सावकारीचा धंदा जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:42 IST2026-04-01T12:42:44+5:302026-04-01T12:42:44+5:30

Ashok Kharat : विधिच्या नावाखाली महिलांवर बलात्कार करणारा भोंदूबाबा अशोक खरात सावकारीही करत असल्याचं उघड झालं आहे.

Bhondubaba Ashok Kharat snatches farmer's land worth Rs 10 crore | Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातने शेतकऱ्याची १० कोटींची जमीन हडपली; सावकारीचा धंदा जोरात

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातने शेतकऱ्याची १० कोटींची जमीन हडपली; सावकारीचा धंदा जोरात

शिर्डी : विधिच्या नावाखाली महिलांवर बलात्कार करणारा भोंदूबाबा अशोक खरात सावकारीही करत असल्याचं उघड झालं आहे. शिर्डीतील एका शेतकऱ्याची त्याने दहा कोटी रुपयांची मालमत्ता लुबाडल्याची तक्रार आहे. शिर्डी पोलिसांनी खरात व पत्नी कल्पना अशोककुमार खरात (रा. नाशिक), किरण सोनवणे (रा. निमगाव), अरविंद बावके (रा. साकुरी) व अशोक प्रभात तांबे या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीलाही अटक - होण्याची शक्यता आहे.

रावसाहेब गोंदकर यांची शिर्डी व निघोज परिसरात दहा एकर वडिलोपार्जित जमीन आहे. कर्जाचे हप्ते थकल्याने ते आर्थिक अडचणीत होते. यावेळी त्यांचा मित्र किरण सोनवणे याने नाशिकचे कॅप्टन अशोक खरात हे व्याजाने पैसे देतात, अशी माहिती दिली. गोंदकर व सोनवणे या दोघांना मिळून तीन कोटी रुपयांची गरज होती.

खरात प्रकरणात राज्य सरकार सुरुवातीपासून अत्यंत संवेदनशील आणि तत्परतेने कारवाई करत असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कोणतीही ढिलाई करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. खरातवर प्रतिक्रिया दिली नसल्याची टीका त्यांच्यावर होत होती.

त्यासाठी ऑगस्ट २०२३ मध्ये नाशिक येथे बैठक होऊन खरात याने २ टक्के व्याजाने पैसे देण्याचे कबूल केले. मात्र, सुरक्षेसाठी जमीन खरेदीखत करून देण्याची अट घातली. गोंदकर यांनी विश्वासाने आपली चार एकर जमीन खरातच्या नावे करून दिली.

अधिकारीही मिरगावला

अहिल्यानगर जिल्ह्यातील काही अधिकारीदेखील खरातच्या आश्रमात जाऊन तेथे काही राजकीय नेत्यांना भेटत होते. राजकीय नेते तेथे आले की ते अधिकाऱ्यांना बोलवून घेत होते. अधिकाऱ्यांना तेथे का बोलवले जात होते? याची प्रशासनात चर्चा सुरू आहे.
 

Web Title : फर्जी बाबा अशोक खरात ने किसान की जमीन हड़पी; साहूकारी का धंधा ज़ोरों पर

Web Summary : महिलाओं से बलात्कार के आरोपी अशोक खरात पर शिर्डी में एक किसान की करोड़ों की जमीन हड़पने का आरोप है। पुलिस ने खरात और सहयोगियों के खिलाफ मामला दर्ज किया है। जांच जारी है।

Web Title : Fake Baba Ashok Kharat swindled farmer's land; Loan sharking thrives.

Web Summary : Ashok Kharat, accused of raping women, faces charges of exploiting a farmer in Shirdi, seizing land worth crores. Police have filed a case against Kharat and accomplices for this fraudulent land grab. Investigation underway.