दोन गावठी कट्ट्यांसह काडतुसे जप्त भद्रकाली पोलिसांची कारवाई : तिघांना अटक

By Admin | Updated: March 7, 2015 00:10 IST2015-03-07T00:09:51+5:302015-03-07T00:10:27+5:30

दोन गावठी कट्ट्यांसह काडतुसे जप्त भद्रकाली पोलिसांची कारवाई : तिघांना अटक

Bhadrakali police seized two cartridges with cartridges: Three arrested | दोन गावठी कट्ट्यांसह काडतुसे जप्त भद्रकाली पोलिसांची कारवाई : तिघांना अटक

दोन गावठी कट्ट्यांसह काडतुसे जप्त भद्रकाली पोलिसांची कारवाई : तिघांना अटक

नाशिक : शहरातील गजबजलेले ठिकाण असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका बारसमोर गावठी पिस्तूल विकण्याच्या प्रयत्नात असलेले संशयित निखिल गवळी, योगेश गांगुर्डे, राकेश सोनार या तिघांना भद्रकाली पोलिसांनी शुक्रवारी (दि़६) दुपारच्या सुमारास अटक केली़ त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले, दोन जिवंत काडतुसे तसेच इंडिका कार जप्त करण्यात आली आहे़ शहरातील काही सराईत गुन्हेगार सीबीएस परिसरात देशी बनावटीचे गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार शुक्रवारी दुपारपासूनच सीबीएस, टॅक्सीस्टॅण्ड या परिसरात पाळत ठेवण्यात आली होती़ भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना गुलशनबार समोर तीन संशयित उभे असल्याची माहिती मिळाली़ त्यांनी तत्काळ सहायक पोलीस निरीक्षक वाल्मीक पाटील आणि सहकाऱ्यांना पाठवून तिघांना ताब्यात घेतले़ संशयित निखिल विलास गवळी (अशोकनगर, सातपूर), योगेश दादा गांगुर्डे (भद्रकाली), राकेश अंबादास सोनार (रा़जाधव संकुल, त्र्यंबक रोड, सातपूर) यांच्याकडून प्रत्येकी २० हजार २०० रुपयांचे दोन गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे तसेच एक लाख रुपयाची इंडिका कार (एमएच ०४, सीई ४१९१) असा एकूण १ लाख ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ दरम्यान, भद्रकाली पोलीस ठाण्यात या तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी ही पिस्तूले कुठून आणले, ते कोण विकत घेणार होते, यामध्ये कुणाचा सहभाग आहे याची भद्रकाली पोलिसांकडून चौकशी सुरू आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Bhadrakali police seized two cartridges with cartridges: Three arrested