शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

गुजराथी स्मृती बालनाट्य स्पर्धेला सुरुवात

By admin | Updated: February 14, 2015 00:18 IST

साने गुरुजी कथामाला : औरंगाबादकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन

नाशिक : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व शालेय जीवनातच त्यांच्यातील अभिनयाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन साने गुरुजी कथामालेअंतर्गत आयोजित केलेल्या रत्नाकर गुजराथी स्मृती बालनाट्य या तीनदिवसीय स्पर्धेेला सुरुवात झाली असून, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नरेश महाजन, बालभवन विभागाचे प्रमुख गिरीश नातू, संतोष गुजराथी, हितेंद्र नाईक, मीना वाघ, बालभवनच्या समिती सदस्य डॉ. आशा कुलकर्णी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. एकूण १५ शाळा व संस्थांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १००१, ५०१ व ३०१ रुपये व स्मृतिचिन्ह बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे.नाट्यस्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुनंदा केले विद्यालयाने ‘शक्ती की युक्ती’, स्वामिनारायण इंग्रजी माध्यम शाळेने ‘आजी कुठे दिसत नाही’, पुरुषोत्तम इंग्रजी माध्यम शाळेने ‘येरे येरे पावसा’, रुंग्टा हायस्कूलने ‘आॅफ पिरियड’ या नाटकांचे सादरीकरण केले. यातील ‘आॅफ पिरियड’ या नाटकाच्या माध्यमातून रुंग्टा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आॅफ पिरियडमध्ये विद्यार्थी काय काय चर्चा करतात, हे दाखविण्यात आले. देशाच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकून देशाचे नागरिकच येथील परिस्थितीस जबाबदार असल्याचे या नाटकातून दर्शविण्यात आले. सत्ताधाऱ्यांच्या काळ्या कर्तृत्वाचे चित्र उभारून आजची पिढी प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया याच्या आहारी गेल्याने देशाची अधोगती होते आहे. त्यामुळे याचा अतिवापर टाळणेच योग्य असल्याचा संदेश यातून देण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, भारतमाता, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून देत त्यांच्या पावलावर पाऊल टाकल्यास आपल्या देशाचा नक्कीच विकास होईल, असा विश्वासही या नाटकातून व्यक्त करण्यात आला. दरम्यान, हितेंद्र नाईक व मीना वाघ यांनी परीक्षकांची भूमिका बजावली. (प्रतिनिधी)