शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! आता तिप्पट दंडवसुली

By admin | Updated: November 16, 2016 01:15 IST

बेशिस्त वाहतूक : वाहनांची कागदपत्रे नसल्यास आजपासून होणार कारवाई

नाशिक : वाहनचालकांकडून नियमांच्या होणाऱ्या पायमल्लीस आळा बसावा तसेच वाहतुकीस शिस्त लागावी यासाठी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी कडक पावले उचलली आहेत़ बुधवारपासून (दि़ १६) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीचालकांकडून नवीन सुधारित दरानुसार दंडवसुली केली जाणार असून, दंडाची ही रक्कम सद्यस्थितीतील दंडाच्या तिप्पट आहे़ त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना एकतर विचार तरी करावा लागेल; वा तिप्पट दंड भरण्याची तयारी तरी ठेवावी लागेल़  शहरात वाहनचालकांकडून सिग्नल तोडणे, एकेरी मार्गावरून विरुद्ध दिशेने जाणे, वाहनांची कागदपत्रे, लायसन्स जवळ न बाळगणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे याबरोबरच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे़ या प्रवृत्तीमुळे अपघातांची संख्या वाढत चालली असून, त्यास नागरिक बळी पडत आहेत़ वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना वेसण घालण्यासाठी तसेच शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मंगळवारी रावसाहेब थोरात सभागृहात पोलीस आयुक्तालयातर्फे वाहतूक परिषद -२०१६ चे आयोजन करण्यात आले होते़ पोलीस आयुक्त वाहतूक समस्या जाणून घेत असतानाच कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे वाहनचालक सुसाट झाल्याचे मत काही नागरिकांनी नोंदविले होते़ तसेच जोपर्यंत वाहनचालकांना कायद्याची जरब बसत नाही वा खिशाला झळ लागत नाही तोपर्यंत ही समस्या कायम राहणार असल्याचे मतही मांडण्यात आले़ त्यामुळे आयुक्तांनी शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून बुधवारपासून शासनाच्या नवीन सुधारित नियमानुसार दंडवसुली करण्यात येणार असल्याचे जाहीर केले़ विशेष म्हणजे सुधारित नियमात दंडामध्ये तिप्पट वाढ करण्यात आली आहे़   विनानोंदणी वाहन रस्त्यावर चालविणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, परवाना नसलेल्या व्यक्तीस वाहन चालविण्यास देणे, वाहनाचा विमा काढलेला नसणे, भरधाव वाहन चालविणे यासाठी पूर्वीच्या दंडापेक्षा तिप्पट वाढ करण्यात आली आहे़ तर इतर नियमांमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली असून, यापुढे नवीन नियमानुसार दंडवसुली केली जाणार आहे़