बाळा नांदगावकर यांच्या वाहनाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 22:28 IST2018-12-19T22:26:57+5:302018-12-19T22:28:24+5:30
मनसे प्रमुख राज ठाकरे दोन दिवसांपासून नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत.

बाळा नांदगावकर यांच्या वाहनाला अपघात
नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे कळवण दौऱ्यावर असताना बुधवारी (दि.19) दुपारी मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या इनोव्हा कारला कळवण ग्रामीण पोलिसांच्या जीपने धडक दिली. सुदैवाने, कोणीही जखमी झाले नाही. मात्र, नांदगावकर यांच्या इनोव्हा कारच्या पाठीमागील बाजूचे किरकोळ नुकसान झाले.
मनसे प्रमुख राज ठाकरे दोन दिवसांपासून नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. बुधवारी राज ठाकरे यांचा कळवण, सटाणा, चांदवड, दिंडोरी तालुक्यात दौरा होता. दुपारच्या सुमारास राज ठाकरे कळवण दौऱ्यावर असताना त्यांच्यासमवेत असलेले मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्या इनोव्हा कारला ताफ्यात असलेल्या कळवण ग्रामीण पोलिसांच्या जीपने पाठीमागून धडक दिली. या धडकेमुळे इनोव्हा कारच्या मागील बंपरच्या ड्रायव्हर साईडचे नुकसान झाले.
या इनोव्हात बाळा नांदगावकर होते. सुदैवाने, कुणालाही इजा झाली नाही. दौऱ्याच्या धावपळीमुळे हा अपघात घडला. मात्र, समजुतीने दोन्ही वाहने पुन्हा राज यांच्या दौऱ्यात सामील झाली.