शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धोकेदायक ठिकाणांवर लक्ष

By admin | Updated: August 2, 2014 01:23 IST

सीमेवरील धरणाची गळती : गुजरात राज्याशी संपर्क

नाशिक : माळीण येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्णातील धोकेदायक ठिकाणांची माहिती गोळा करून ज्या ठिकाणी दरडी कोसळू शकतील अशा ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे महाराष्ट्र-गुजरात सीमेवर सापुतारालगत असलेल्या धरणातून गळती सुरू झाल्यामुळे नजीकच्या गावांना निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत गुजरात सरकारशी संपर्क साधण्यात आला आहे. जिल्ह्णातील पेठ, सुरगाणा, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या भागांत गेल्या चार-पाच दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्यामुळे काही ठिकाणी माळणीसारखी दरड वा डोंगर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोठी दुर्घटना टाळण्यासाठी अगोदरपासूनच नागरिकांमध्ये जागृती करण्याबरोबर दुर्घटना प्रतिबंध उपाययोजना करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ज्या गावांना अशा स्वरूपाचा धोका आहे, तेथील नागरिकांना संभाव्य धोक्याची कल्पना देण्यासाठी दवंडी पिटण्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर धोकादायक भाग उतरून घेण्याचे व यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण तालुक्यांतील नद्या, नाल्यांच्या पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून, त्यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील सापुतारानजीकच्या मंगलीदिगर येथे गुजरात सरकारने बांधलेल्या मध्यम धरणाला गळती लागली असून, ते धोकेदायक स्थितीत आहे. या धरणाला लागूनच खालच्या बाजूला तलाव आहे. सध्या हा तलाव पाण्याने पूर्ण भरला असून, जर गुजरातचे धरण फुटले तर मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरात सरकारशी व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही यासंदर्भात पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या.