शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
3
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
4
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
5
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
6
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
7
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
8
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
9
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
10
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
11
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
12
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
13
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
14
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
15
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
16
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
17
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
18
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
19
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
20
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
Daily Top 2Weekly Top 5

धावपटू कविता राऊत करणार मतदार नोंदणीसाठी आवाहन

By admin | Updated: September 7, 2016 00:43 IST

मनपा निवडणूक : जनजागृती मोहिमेत सहभाग

नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून दि. १५ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत विशेष मतदार नोंदणी पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जाणार असून, त्यात मतदार नोंदणीसाठी सावरपाडा एक्स्प्रेस व आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी धावपटू कविता राऊत आवाहन करणार आहे. महापालिकेच्या विनंतीनुसार मतदार जनजागृती मोहिमेत कविता राऊतने सहभागी होण्यास संमती दिल्याने आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या हस्ते राऊतचे स्वागत करण्यात आले.फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू असतानाच मनपातर्फे मतदार जागृती मोहीमही राबविली जाणार आहे. दि. १ जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या व्यक्तीस मतदार म्हणून नाव नोंदविता येणार आहे. सदर निवडणुकीत मतदान करण्यासाठी विधानसभेच्या मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. महापालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या मतदार जागृती अभियानासाठी धावपटू कविता राऊत यांना प्रसिद्धी कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार राऊत यांनी सक्रिय सहभागी होण्यास संमती दर्शविली आहे. त्यामुळे महापालिकेमार्फत प्रसिद्ध होणारी पत्रके, बॅनर्स यावर कविता राऊतची प्रतिमा झळकणार आहे. मतदार जागृतीसाठी कविता राऊत यांनी संमती दिल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रशासन उपआयुक्त विजय पगार, क्रीडा अधिकारी यशवंत ओगले, कविताचे पती महेश तुंगार आदि उपस्थित होते. सध्या गणेशोत्सवाची धामधूम असल्याने नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लक्षात घेता महापालिकेमार्फत मतदारांना आवाहन करणारे बॅनर्स मंडळांच्या मंडपासमोर लावण्यात येत आहेत, शिवाय ध्वनिफितींद्वारेही मतदारांना आवाहन केले जात आहे. (प्रतिनिधी)