अशोक खरातचे किळसवाणे प्रताप! महिलांना म्हणायचा, "मी देव आहे, तुझे योनी शुद्धीकरण करावं लागेल"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 17:31 IST2026-03-21T17:27:22+5:302026-03-21T17:31:10+5:30
Ashok Kharat Crime News: अशोक खरातला अटक केल्यानंतर त्यांच्या प्रतापांचे नवनवे किस्से समोर येऊ लागले आहेत. ज्या व्यक्तीने पहिल्यांदा खरातकडून महिलांवर होत असलेल्या अत्याचारांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता, त्यानेच आता मोठे गौप्यस्फोट केले आहेत.

अशोक खरातचे किळसवाणे प्रताप! महिलांना म्हणायचा, "मी देव आहे, तुझे योनी शुद्धीकरण करावं लागेल"
Ashok Kharat Latest News: भोंदू अशोक खरात यांने केलेल्या कारनाम्यांची माहिती आता पुढे येत आहे. खरातच्या विरोधात वार्तांकन केले म्हणून रुपाली चाकणकर यांनी ज्यांना अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप केला गेला आहे. त्याच संपादक दत्तात्रय खेमनार यांनी खरातचे किळसवाणे प्रताप सांगितले आहेत. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत खेमनार म्हणाले की, अशोक खरातकडे उच्च शिक्षित आणि राजकारणी घरातील महिलाही यायच्या. खरात त्यांना संमोहित करायचा. त्यांना गुंगीचा पदार्थ द्यायचा आणि शरीरसंबंध ठेवायचा.
दत्तात्रय खेमनार म्हणाले की, "खरातकडे येणाऱ्या महिला उच्च शिक्षित, सरकारी अधिकारी आणि राजकीय घराण्यातील आहेत. खरात महिलांना म्हणायचा की, 'मी देव आहे. तुझे आयुष्य चांगले करायचे असेल, तर मला तुझे योनी शुद्धीकरण करावे लागेल.' त्यानंतर तो महिलांना स्वतःचे मूत्र प्यायला द्यायचा."
महिला गर्भवती, उद्योजकाकडून २० कोटी उकळले
खेमनार यांनी खरात याने व्यावसायिकांना कसे लुबाडले याच्याही घटना सांगितल्या. ते म्हणाले की, "एका व्यावसायिकाला व्यवसायात तोटा झाला होता. तो अशोक खरातकडे आला. त्याला खरातने खोटी रत्ने दिली. आधी साडेतीन लाख रुपयांना एक रत्न विकले. दुसरे रत्न दोन लाख रुपयांना विकले. ही दोन्ही रत्ने खोटी असल्याचे नंतर व्यावसायिकाला समजले."
"अशोक खरात हा त्याच्याकडे येणाऱ्या महिला आणि पुरुषांना एकमेकांशी संबंध ठेवायला सांगायचा. एका उद्योजकाचे त्याने एका दुसऱ्या महिलेसोबत सूत जुळवून दिले होते. ती महिला तुझ्यामुळे गर्भवती राहिली आहे, असे खोटेच सांगून त्याने त्या उद्योजकाकडून २० कोटी रुपये उकळले", असा दावा खेमनार यांनी केला आहे.
कोंबडी चोर, हाँगकाँग ते स्वयंघोषित कॅप्टन
अशोक खरातला अटक झाल्यानंतर आता सिन्नर तालुक्यात त्याच्याबद्दल जोरात चर्चा होत आहे. तो सिन्नर तालुक्यातील काहांडाळवाडी या गावचा मूळ रहिवासी आहे.
अगदी तरुण वयात त्याच्यावर गावात कोंबडी चोर, सायकल चोर असा शिक्का बसल्याने तो परागंदा झाला होता. त्यानंतर जवळपास २० वर्षांनी गावात परतल्यावर तो आपण मर्चट नेव्हीमध्ये कॅप्टन असल्याचे सांगू लागला.
तसेच अंकशास्त्र ज्योतिषी असल्याचा दावा करू लागला. त्याच सुमारास त्याने नाशिकला स्थायिक होऊन बाबगिरी सुरू केल्याची जोरदार चर्चा स्थानिक स्तरावर रंगत आहे.