Ashok Kharat: "तू विरोध केला, तर तुझ्या वडिलांचा मृत्यू घडवून आणेन", अशोक खरात त्या तरुणीला काय काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 14:31 IST2026-03-25T14:30:22+5:302026-03-25T14:31:48+5:30

अशोक खरात विरोधात आणखी एक तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एका तरुणीला गुंगीचा पदार्थ देऊन खरातने बलात्कार केल्याचे म्हटले आहे.

Ashok Kharat: "If you resist, I will cause your father's death", what did Ashok Kharat say to the young woman? | Ashok Kharat: "तू विरोध केला, तर तुझ्या वडिलांचा मृत्यू घडवून आणेन", अशोक खरात त्या तरुणीला काय काय म्हणाला?

Ashok Kharat: "तू विरोध केला, तर तुझ्या वडिलांचा मृत्यू घडवून आणेन", अशोक खरात त्या तरुणीला काय काय म्हणाला?

Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातविरोधोत आणखी एका पीडितेने तक्रार दिली. तिच्यासोबत खरातने केलेल्या कृत्येही भयंकर आहेत. तरुणीवर अत्याचार करतानाचे खरातने व्हिडीओ बनवले आणि त्यानंतर तेच व्हिडीओ दाखवून त्याने अनेक वेळा बलात्कार केल्याचे म्हटले आहे.

खरातने चांगले करिअर घडवून देण्याचे आमिष दाखवत संमोहनाच्या माध्यमातून अत्याचार केले. त्यानंतर ठार मारण्याच्या धमक्या देत गप्प बसण्यास सांगितले. इतकंच नाही, तर काही काळानंतर मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवून पुन्हा ब्लॅकमेल करत अत्याचार सुरू केले, असे धक्कादायक आरोप या तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.

"मी महादेवाचा अवतार, तुझे...", तरुणीसोबत काय घडलं?

तक्रारीनुसार, जुलै २०२४ मध्ये पीडिता आपल्या आई-वडिलांसह अशोक खरातकडे गेली होती. आरोपी अशोक खरातने तिला एकटीला आत बोलावले. 

खरातने तिला पाणी दिले ज्यामध्ये गुंगीकारक पदार्थ मिसळलेला असावा. कारण ते पाणी पिल्यानंतर तिची अवस्था बदलली आणि आरोपीने संमोहनासारख्या प्रकाराने तिच्यावर नियंत्रण मिळवले. 

तरुणीला गुंगी येत असतानाच अशोक खरात तिला म्हणाला की, 'मी महादेवाचा अवतार आहे.' त्यानंतर त्याने तरुणीवर बलात्कार केला. 

"मी तुझे करिअर घडवेन" असे सांगून विश्वास संपादन केला, तर विरोध केल्यास तुझ्या वडिलांचा मृत्यू घडवून आणेन व कुटुंब उद्ध्वस्त करेन, अशी भीती दाखवत तिला धमकावले. 

फिर्यादीनुसार, जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत आरोपीने अशा प्रकारे अत्याचार केले. सततच्या धमक्यांमुळे पीडिता बराच काळ गप्प राहिली.

अशोक खरातने नंतर व्हिडिओ पाठवून...

डिसेंबर २०२५ मध्ये पीडितेला एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून अशोक खरातसोबतचा अश्लील व्हिडिओ पाठवण्यात आला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिने ही बाब आपल्या आई-वडिलांना सांगितली. आरोपीला विचारणा केली असता, त्याने हा व्हिडिओ 'एआयद्वारे तयार केलेला' असल्याचा दावा करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

Web Title : अशोक खरात ने पीड़िता को धमकी दी: 'मैं तुम्हारे पिता को मार डालूंगा'.

Web Summary : बलात्कार के आरोपी अशोक खरात ने एक महिला को धमकी दी, सम्मोहन के माध्यम से करियर में उन्नति का वादा किया, फिर वीडियो से ब्लैकमेल किया. उसने विरोध करने पर उसके पिता को मारने की धमकी दी, और अश्लील वीडियो भेजे.

Web Title : Ashok Kharat threatened victim: 'I will kill your father'.

Web Summary : Ashok Kharat, accused of rape, threatened a woman, promising career advancement through hypnosis, then blackmailing her with videos. He threatened to kill her father if she resisted, and sent obscene videos.