नाशिक - कोठडीच्या पहिल्या दोन दिवसांत पोलिसांचे भविष्य सांगणारा भोंदू खरात आता स्वतःच्या भवितव्याबाबत चिंताग्रस्त झाल्याचे समोर आले आहे. लवकरच तुरुंगातून बाहेर पडणे कठीण असल्याची जाणीव त्याला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महिलांचे लैंगिक शोषण व फसवणूक प्रकरणात पोलिसांनी त्याच्या जप्त मोबाइलमधील राजकीय व शासकीय कनेक्शनची तपासणी सुरू केली आहे. मात्र, एसआयटीकडून ठोस कारवाई न झाल्याने गूढ वाढले आहे.
अलीकडेच त्याच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची झडती घेऊन तिसऱ्या गुन्ह्याचे बारकावे तपासण्यात आले. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून, पुढील चौकशीसाठी शिर्डी पोलिस ताबा घेणार आहेत. एसआयटीच्या तपास अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ईडीच्या पथकाने अशाेक खरातच्या ईशानेश्वर मंदिर, नाशिकमधील कार्यालय, गौळाणेनजीकचा मोठा प्लॉट येथे भेट देऊन प्रॉपर्टींची मोजणी केली. प्रॉपर्टींचे सध्याचे बाजारमूल्य ईडीने तपासले असून, प्रॉपर्टी जमविण्यामागे खरातचा उद्देश काय होता?, याचाही तपास ईडी करीत आहे. प्राप्त माहितीनुसार ईडीने खरातचे बँक खाते सील केल्यानंतर त्याचे विश्लेषण केले जात आहे.
Web Summary : Ashok Kharat, accused of sexual exploitation and fraud, is anxious about his future. Police are investigating his political connections. His properties are being assessed by ED. Bank accounts are sealed.
Web Summary : यौन शोषण और धोखाधड़ी के आरोपी अशोक खराट को अपने भविष्य की चिंता है। पुलिस उसके राजनीतिक संबंधों की जांच कर रही है। ईडी उसकी संपत्तियों का आकलन कर रही है। बैंक खाते सील कर दिए गए हैं।