शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आठ देशांतील कलाकारांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2016 23:07 IST

आठ देशांतील कलाकारांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

कळवण : युक्रेन, रशिया, इंग्लंड, चीन, इटली, स्पेन, कॅनडा व बेल्जियम या आठ देशांतील २२ कलाकारांनी विविध भजने, नृत्यातून ही भारतीय संस्कृतीची महान परंपरा उभी केली तेव्हा उपस्थितांच्या नेत्रांची पारणे फेडली. कळवण येथील साई लॉन्समध्ये आयोजित निर्मलादेवी सहजयोग राष्ट्रीय ट्रस्टतर्फे या आंतरराष्ट्रीय युवाशक्तीच्या भारत दौऱ्याचे आयोजन केले असून, त्या अंतर्गत हा आगळावेगळा नृत्याविष्कार पार पडला. सहजयोग कार्यक्रम निमित्ताने परदेशी पाहुण्यांनी कळवणकरांना थक्क केले. तबला, गिटार, मृदंग, टाळ या वाद्यांच्या संगतीने परदेशी युवतींनी सादर केलेले कथ्थक व कुच्चीपुडी नृत्य... बम बम भोले, श्री गणेशा गणेशा, जय जय महाराष्ट्र माझा, महालक्ष्मी स्तोत्र आदिंसह नृत्याविष्कार, अगदी तालासुरात मुग्ध करणारी भजने सादर करीत परदेशी युवा कलाकारांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. वैविध्यपूर्ण असलेल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास आपल्याला नव्हे तर जगाला प्रिय आहे, याचे या रंगारंग कार्यक्रमा-निमित्त पुन्हा एकवार दर्शन घडले. महाराष्ट्राची मराठमोळी ओळख असलेले फेटे या परदेशी युवकांना श्रीकांत खंदारे या येथील कलाकाराने बांधले होते. त्यामुळे हा कार्यक्र म अधिकच संस्कृतीचे दर्शन घडवणारा झाला.