नायगावच्या उपसरपंचपदी अर्चना बुरकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 07:09 PM2019-11-10T19:09:56+5:302019-11-10T19:10:12+5:30

नायगाव येथील उपसरपंचपदी अर्चना हनुमंत बुरकूल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच नीलेश तुकाराम कातकाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

Archana Burkul as Vice-Chancellor of Naigaon | नायगावच्या उपसरपंचपदी अर्चना बुरकूल

नायगावच्या उपसरपंचपदी अर्चना बुरकूल

googlenewsNext

नायगावच्या उपसरपंचपदी अर्चना बुरकूल यांची बिनविरोध निवड झाली. त्याप्रसंगी सरपंच नीलेश कातकाडे, संग्राम कातकाडे, गुलाब भांगरे, विष्णू पाबळे, रोशन गायकवाड, रामभाऊ कदम, डी. झेड. बन आदी.
नायगाव : येथील उपसरपंचपदी अर्चना हनुमंत बुरकूल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच नीलेश तुकाराम कातकाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
उपसरपंचपदासाठी अर्चना बुरकूल यांच्या नावाची सूचना विष्णू पाबळे यांनी मांडली, तर भीमा जाधव यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. निर्धारित वेळेत एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय बन यांनी उपसरपंचपदी बुरकूल यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच बुरकूल यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच कातकाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य संग्राम कातकाडे, गुलाब भांगरे, विष्णू पाबळे, भीमा जाधव, रोशन गायकवाड, आशा कदम, सुनीता जेजुरकर, मंदाबाई बर्डे, सुनीता पिंपळे आदी ग्रामपंचायत सदस्यांसह भारत जेजुरकर, रामभाऊ कदम, हनुमंत बुरकूल, सप्तर्षी जेजुरकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Archana Burkul as Vice-Chancellor of Naigaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.