शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

राजीवनगरमध्ये दरवाजा ठोठावून ओरबाडले महिलेचे मंगळसूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:04 IST

शहरातील पोलीस वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत असताना चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. इंदिरानगरच्या राजीवनगर परिसरात गुरुवारी (दि.९) घराचा बंद दरवाजा ठोठावून एका महिलेला अज्ञात चोरट्याने सुऱ्याचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र बळजबरीने तोडून नेल्याचा प्रकार घडल्याने परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इंदिरानगर : शहरातील पोलीस वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत असताना चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. इंदिरानगरच्या राजीवनगर परिसरात गुरुवारी (दि.९) घराचा बंद दरवाजा ठोठावून एका महिलेला अज्ञात चोरट्याने सुऱ्याचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र बळजबरीने तोडून नेल्याचा प्रकार घडल्याने परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरात एकीकडे हेल्मेट सक्ती आणि वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस ठिकठिकाणी नाकेबंदी करीतअसताना दुसरीकडे सोनसाखळी चोरणाºया व घरफोड्या करणाºया गुन्हेगारांनी अशाप्रकारे उघडपणे लुटमारीचे प्रकार करून पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. राजीवनगर परिसरात वैभव कॉलनीतील कृष्णा पार्क अपार्टमेंटमध्ये गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास काळे कपडे परिधान केलेल्या एका अज्ञात चोरट्याने मीनाक्षी केसरकर यांचा दरवाजा ठोठावला. त्यांनी दरवाजा उघडला असता चोरट्यांनी त्यांना बाहेर खेचून सुºयाचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडण्याचा प्रयत्न केला; परंतु मीनाक्षी यांनी त्यांना प्रतिकार केला. या झटापटीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रासह १० ते १५ ग्रॅमची सुमारे ३५ हजार रुपये किमतीची अर्धी पोत तुटून चोरट्यांच्या हातात गेली. यावेळी मीनाक्षी यांनी आरडाओरडा केल्यामुळे शेजारी जमण्याच्या भीतीने चोरट्याने इमारतीच्या वरच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर शेजारील रहिवाशांनी चोरट्याचा शोध घेतला; परंतु तो सापडला नाही. दरम्यान, चोरट्याशी झालेल्या झटापटीत मीनाक्षी केसरकर यांच्या गळ्याला व डाव्या हाताला दुखापत झाल्यामुळे त्यांनी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशा प्रकारांमध्ये चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना नेहमीच अपयश आल्याने चोरट्यांचे धाडस वाढले असून, आता थेट घराच्या दरवाजापर्यंत पोहोचून महिलांचे दागिने ओरबाडण्यापर्यंत चोरांची मजल पोहोचल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.चोरट्यांचे धाडस वाढलेनाशिक शहरातील विविध रस्त्यांवरून शतपावली करणाºया महिलांसोबत, सकाळी व्यायामासाठी घराबाहेर पडणाºया, शाळेत मुलांना सोडण्यासाठी जाणाºया पादचारी महिलांच्या अंगावरील दागिने दुचाकीवरून चोरण्याचे प्रकार यापूर्वी घडत होते. आता चोरट्यांचे धाडस वाढले आहे़

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस