ठेंगोड्यात सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

By Admin | Updated: August 24, 2016 22:11 IST2016-08-24T22:08:55+5:302016-08-24T22:11:09+5:30

ठेंगोड्यात सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

Approval Resolution on the Sarpanch in the Silence | ठेंगोड्यात सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

ठेंगोड्यात सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

 ठेंगोडा : येथील सरपंच सुनीता रवींद्र ठाकरे यांच्यावर ग्रामपंचायतच्या १७ पैकी १३ सदस्यांनी दि. १९ रोजी सटाणा तहसीलदार यांच्याकडे सरपंच कामकाज करताना मनमानी करतात. सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. जनसुविधांचा विचार करीत नाही आदि कारणावरून अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात आला होता.
या प्रस्तावावर चर्चा करणे व मतदान घेणे यासाठी मंगळवारी (दि.२३) ठेंगोड्याच्या ग्रामपंचायत सभागृहात तहसिलदार सुनील
सैंदाणे यांनी विशेष सभा बोलाविली होती. सभेत १७ पैकी १६ सदस्य हजर होते , तर एक सदस्य गैरहजर
होता.यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने १३ सदस्यांनी मतदान केल्याने १३ विरु द्ध ३ या बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाल्याची माहिती तहसीलदार सुनील सैदाणे यांनी दिली.
अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून सटाणा पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला
होता. (वार्ताहर)

Web Title: Approval Resolution on the Sarpanch in the Silence