अन्नसुरक्षा मानकांबाबत सूचना पाठविण्याचे आवाहन

By Admin | Updated: September 26, 2015 22:37 IST2015-09-26T22:36:57+5:302015-09-26T22:37:37+5:30

अन्नसुरक्षा मानकांबाबत सूचना पाठविण्याचे आवाहन

Appeal to send instructions on food safety standards | अन्नसुरक्षा मानकांबाबत सूचना पाठविण्याचे आवाहन

अन्नसुरक्षा मानकांबाबत सूचना पाठविण्याचे आवाहन

नाशिक : अन्नसुरक्षा मानके कायद्यात सुधारणा करण्यासाठी केंद्र शासन तयार झाले असून, त्यासाठी सूचना आणि हरकती महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने अन्न व सुरक्षा मानके कायदा केला असून, त्याची महाराष्ट्र शासनाकडून अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, नियमांचे पालन करताना अनेक अडचणी निर्माण होत असून, त्यामुळे महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या वतीने केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन व्यावसायिकांच्या अडचणी मांडल्या होत्या. त्याची दखल घेऊन शासनाने कायद्यात सुधारणा करण्यासाठी हरकती आणि सूचना मागविल्या असून, त्या महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज चेंबरचे कार्यालय, २०१ सारडा संकुल, महात्मा गांधी पथ, नाशिक येथे पाठविण्याचे आवाहन वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा व विलास शिरोरे केले आहे.

Web Title: Appeal to send instructions on food safety standards