शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कविता गायनात अनुजा, हर्षिता, मनस्वी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:27 IST

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवनतर्फे विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या आॅनलाइन गीतगायन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, या स्पर्धेत अनुजा चौधरी, हर्षिता बद्दर, मनस्वी जगझाप यांनी वेगवेगळ्या गटात प्रथम क्रमांक पटकविला आहे.

ठळक मुद्देपावसाळी स्पर्धा : सावाना बालभवन निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवनतर्फे विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या आॅनलाइन गीतगायन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, या स्पर्धेत अनुजा चौधरी, हर्षिता बद्दर, मनस्वी जगझाप यांनी वेगवेगळ्या गटात प्रथम क्रमांक पटकविला आहे.सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवनातर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी पावसाळी कविता गायन स्पर्धा घेण्यात येतात. यंदा कोरोनाच्या संकटातही ही परंपरा अखंडित राखण्यासाठी आॅनलाइन कविका, गीतगायन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला असून, वेगवेगळ्या तीन गटांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांमधून या विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रत्येक विद्यार्थ्याला कविता गायन सादर करण्यासाठी दोन मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. या स्पर्धेचे गीता बागुल, अर्चना सूर्यवंशी यांनी परीक्षण केले होते. एकूण १४० स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी प्र्रथम, द्वितीय, तृतीय असे प्रत्येक गटात तीन व उत्तेजनार्थ असे एकूण १९ विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आल्याची माहिती बालभवनचे प्रमुख संजय करंजकर यांनी दिली. पारितोषिक विजेते सावाना बालभवनतर्फे पावसाळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, यात गट एकमध्ये अनुजा चौधरी प्रथम, मान्यता सोनावणे द्वितीय, राधा कापुरे हिला तृतीय, तर श्रीराज निकम, कामाक्षी सोनावणे, भाग्यश्री टिंभे, हेमंत आहिरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. गट दोनमध्ये हर्षिता बद्दर, रेवा कासार, काव्या देवरे यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक व सोहम मोरे, दुर्वा उदागे व अवधुत गवळी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तिसऱ्या गटात मनस्वी जगझाप, साई बत्तासे, चिन्मय गरुड यांनी अनुक्रम प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रणव गवळी, स्वानंदी तिडके, वेदांत बोराडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहेत.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी