शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांसाठी अ‍ॅँटिजेन किटची ‘लाखाची बात’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 17:58 IST

नाशिकमधील वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर नाशिकला गत आठवड्यात मिळालेल्या दहा हजार अ‍ॅँटिजेन किटचा होत असलेला प्रभावी उपयोग पाहून नाशिक महापालिकेने एक लाख अ‍ॅँटिजेन किट मागविण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या दहा मिनिटांत टेस्टचा अहवाल देणाऱ्या या किटचा वापर प्रामुख्याने हायरिस्क पेशंटसाठी तसेच कंटेन्मेंट झोनमधील रुग्णांसाठी करता येत असून, झटपट अहवालामुळे हे किट कोरोनाचा प्रसार रोखण्यात प्रभावी भूमिका निभावण्याची शक्यता आहे.

नाशिक : नाशिकमधील वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर नाशिकला गत आठवड्यात मिळालेल्या दहा हजार अ‍ॅँटिजेन किटचा होत असलेला प्रभावी उपयोग पाहून नाशिक महापालिकेने एक लाख अ‍ॅँटिजेन किट मागविण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या दहा मिनिटांत टेस्टचा अहवाल देणाऱ्या या किटचा वापर प्रामुख्याने हायरिस्क पेशंटसाठी तसेच कंटेन्मेंट झोनमधील रुग्णांसाठी करता येत असून, झटपट अहवालामुळे हे किट कोरोनाचा प्रसार रोखण्यात प्रभावी भूमिका निभावण्याची शक्यता आहे.नाशिक महानगरात दररोज दोनशेहून अधिक बाधित रुग्ण आढळू लागल्याने तसेच अहवाल प्रलंबित राहण्याच्या प्रमाणातदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. महानगरात वाढत असणारे बहुतांश रुग्ण हे बाधितांच्या नात्यागोत्यातील आणि निकटवर्तीयांपैकी आहेत. अशा परिस्थितीत बाधितांच्या निकटवर्तीयांच्या जर झटपट चाचण्या झाल्या आणि त्यात जे बाधित आढळतील त्यांना त्वरित दाखल करून घेतले तर बाधितांची पुढील साखळी संपुष्टात येऊन दररोजच्या बाधितांचे प्रमाण नियंत्रणात येणे शक्य होऊ शकणार आहे. बाधितांच्या संपर्कातील आणि संशयितांची चाचणी त्वरित झाल्यास अशा रुग्णांवर तातडीने उपचार होऊन त्यांच्यापासून पुढे होणारा संसर्ग रोखता येऊ शकतो, ही या अ‍ॅँटिजेन किट चाचणीची सर्वाधिक सकारात्मक बाजू आहे. मनपा आयुक्तांनी वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरकडे सुमारे दहा हजार टेस्टिंग किटची मागणी केली होती. त्या किट प्राप्त झाल्यानंतर प्रारंभीच्या टप्प्यात दररोज २०० अ‍ॅँटिजेन किटद्वारे तपासणी केली जात होती. मात्र, आता त्यांची उपयुक्तता लक्षात घेऊन त्या प्रमाणातही वाढ करण्याचा निर्णय घेतला. तसेच या अ‍ॅँटिजेन किट एक लाख मागविण्याचा निर्णय नाशिक महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याशिवाय नाशिक महापालिकेकडून आयसीएमआरकडे अ‍ॅँटिबॉडी टेस्ट किटचीदेखील मागणी करण्यात आली असून, येत्या काही दिवसांत त्या टेस्टकिटदेखील नाशिकला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोन्ही किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यास आणि कंटन्मेंट झोन, हायरिस्क पेशंट किंवा बाधितांचे निकटवर्ती संशयित यांच्या चाचण्या झटपट होऊन नाशकातील कोरोनाला काही प्रमाणात तरी आळा घालणे शक्य होणार आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या