शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

...अन देखावे खुले झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:19 IST

ध्वनिमर्यादा, मंडपाचा आकार, गणेशमूर्ती व भाविकांची सुरक्षा आदीबाबत विविध नियमावलींचे पालन करण्यासाठी सातत्याने पोलीस प्रशासनाकडून दबाव वाढविला जात होता; यामुळे भालेकर मैदानावरील सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी (दि.२८) घेतला. सदर बाब पोलीस आयुक्तांपर्यंत पोहचल्यानंतर वरिष्ठ अधिकाºयांनी मैदानावर दाखल होऊन सर्व मंडळांच्या पदाधिकाºयांशी चर्चा करत आश्वासने दिली. यानंतर रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास मंडळांनी देखावे खुले केले.

नाशिक : ध्वनिमर्यादा, मंडपाचा आकार, गणेशमूर्ती व भाविकांची सुरक्षा आदीबाबत विविध नियमावलींचे पालन करण्यासाठी सातत्याने पोलीस प्रशासनाकडून दबाव वाढविला जात होता; यामुळे भालेकर मैदानावरील सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी (दि.२८) घेतला. सदर बाब पोलीस आयुक्तांपर्यंत पोहचल्यानंतर वरिष्ठ अधिकाºयांनी मैदानावर दाखल होऊन सर्व मंडळांच्या पदाधिकाºयांशी चर्चा करत आश्वासने दिली. यानंतर रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास मंडळांनी देखावे खुले केले. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान महाकवी कालिदास कलामंदिरासमोरील भालेकर मैदानावर विविध खासगी कंपन्यांच्या कर्मचाºयांचे सार्वजनिक गणेश उत्सव समितीकडून देखाव्यांचे सादरीकरण केले जाते. यावर्षीदेखील आठ ते दहा मंडळांनी या मैदानावर विविध विषयांनुसार देखाव्यांचे सादरीकरण केले आहे. यंदा मात्र पोलीस प्रशासनाकडून मंडपाच्या उभारणीपासूनच ससेमिरा सुरू केल्यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. सातत्याने भद्रकाली पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाºयांकडून मंडळांना सूचना प्राथमिक स्वरूपात तोंडी दिल्या जात होत्या. त्यानंतर लेखी स्वरूपात नोटिसा बजावण्यात आल्यामुळे मंडळांचे पदाधिकारी संतप्त झाले. सर्व मंडळांनी एकत्र येत बैठक घेऊन सोमवारी रात्री देखावे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी देखावे सुरू झाले नाही. पावसाने काही वेळ उघडीप दिल्यामुळे भाविकांची देखावे बघण्यासाठी गर्दी झाली होती; मात्र मैदानावर अंधाराचे साम्राज्य पसरल्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला.  सदर वार्ता कर्णोपकर्णी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमांद्वारे दस्तूरखुद्द पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यापर्यंत जाऊन पोहचली. यानंतर त्यांनी भाविकांच्या भावना व गणेशोत्सवाचा आनंद लक्षात घेत तातडीने वरिष्ठ अधिकाºयांना मैदानावर जाण्याचे आदेश दिले.पोलीस ‘बॅकफूट’वर...ध्वनिमर्यादा, मंडपांचा आकार आदींबाबत लेखी नोटिसा बजावल्यामुळे मंडळांच्या पदाधिकाºयांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ देखावे संध्याकाळनंतर सुरू झाले नाही. यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. अखेर पोलिसांनी या ठिकाणी येऊन पदाधिकाºयांची समजूत काढली. कुठल्याही प्रकारच्या कारवाईला मंडळाला सामोरे जाणार नाही, हेतुपुरस्सर सूचना देऊन विनाकारण त्रास देण्याचा पोलिसांचा हेतू नाही, हे पटवून देत पोलीस ‘बॅकफूट’वर आले. त्यानंतर रात्री उशिरा पावणे नऊ वाजता मंडळांनी देखावे सुरू केले.