शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

...अन् रेल्वेस्थानकावर उडाली धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:24 IST

रेल्वे प्रवासी, रेल्वे कर्मचारी आदींवर आलेल्या आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे याची प्रात्यक्षिके नाशिकरोड रेल्वेस्थानकात मंगळवारी (दि. २१) सायंकाळी उत्तर रेल्वेच्या मुरादाबाद येथील नागरी सुरक्षा दलातर्फे करण्यात आली. रेल्वेस्थानकातील दहशतवादी हल्ला, आग, अपघात आदींप्रसंगी जखमी झालेल्या प्रवाशांची सुटका, आग विझवून जखमींचा बचाव करणे आदी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके : रेल्वे सुरक्षा बल, पोलीस विभागांचे कर्मचारी सहभागी

नाशिकरोड : रेल्वे प्रवासी, रेल्वे कर्मचारी आदींवर आलेल्या आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे याची प्रात्यक्षिके नाशिकरोड रेल्वेस्थानकात मंगळवारी (दि. २१) सायंकाळी उत्तर रेल्वेच्या मुरादाबाद येथील नागरी सुरक्षा दलातर्फे करण्यात आली. रेल्वेस्थानकातील दहशतवादी हल्ला, आग, अपघात आदींप्रसंगी जखमी झालेल्या प्रवाशांची सुटका, आग विझवून जखमींचा बचाव करणे आदी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.मुरादाबाद येथील रेल्वेच्या नागरी दलाचे प्रमुख एस. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रात्यक्षिकांत रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस, रेल्वेचे अभियांत्रिकी, आरोग्य, विद्युत, अकौन्ट्स आदी विभागांचे सुमारे साठ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. बचाव पथकाचे प्रमुख सिंग, प्रथमोपचारचे विनोद भट, अग्निशमन दलाचे एस. मंडल, स्टेशनमास्तर आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा आदींच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रात्यक्षिके करण्यात आली. रेल्वेस्थानक अथवा रेल्वे प्रवासात कोणत्याही क्षणी दुर्घटना होऊ शकते, अपघात होऊ शकतात. त्याप्रसंगी मदतीची रंगीत तालीम घेण्यासाठी चार दिवसांपूर्वी मुरादाबादहून नागरी सुरक्षा दलाचे पथक नाशिकरोड स्थानकात आले होते. पहिल्या दिवशी त्यांनी आपत्तीची संभाव्य ठिकाणे शोधली. दुसऱ्या दिवशी निरीक्षण व सराव केला. तर तिसºया दिवशी मंगळवारी सायंकाळी प्रात्यक्षिकांमध्ये रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी असलेल्या महत्त्वाच्या भागात अडकलेल्या जखमी प्रवाशांची सुटका, मदत करण्यात आली. आगीत इमारतीत अडकलेल्या नागरिकांना दोरखंडाच्या सहाय्याने सुखरूप उतरविण्यात आले. ज्वालाग्रही पदार्थामुळे लागलेली आग विझविण्यात आली. प्रात्यक्षिके बघण्यासाठी प्रवासी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, स्थानिक नागरिक, विक्रेते आदींची मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :railwayरेल्वे