आनंदवलीत संदल

By Admin | Updated: September 26, 2016 01:41 IST2016-09-26T01:41:08+5:302016-09-26T01:41:37+5:30

लंगर : रांझेशाह दर्ग्यावर भाविकांची गर्दी

Anandalatta Sandhal | आनंदवलीत संदल

आनंदवलीत संदल

नाशिक : सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले आनंदवली येथील शहीद हजरत सय्यद हसन रांझेशाह बाबा यांच्या संदलनिमित्त भाविकांची गर्दी लोटली होती. शुक्रवारपासून (दि.२३) दर्गा परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
आनंदवली येथील रांझेशाह बाबा यांचा दर्गा राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोख्याचे प्रतीक मानला जातो. नवश्या गणपतीच्या मंदिराला लागूनच दर्गा असून, या ठिकाणी हिंदू-मुस्लीम समाजबांधव मोठ्या भक्तिभावाने आवर्जून हजेरी लावतात. दोन्ही देवस्थाने प्रसिद्ध असून, दरवर्षी रांझेशाह बाबा यांचा संदल उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. शुक्रवारी संध्याकाळपासून संदल उत्सवाला सुरुवात झाली. कव्वाल नईम चिश्ती, सादिक अशरफी यांनी ‘महफिल-ए-समा’मध्ये एकापेक्षा एक सरस उर्दू शेरोशायरीची उधळण करीत सुफीसंतांवर आधारित कव्वाली सादर केल्या. शनिवारी सकाळी रांझेशाह बाबा दर्गा विश्वस्त समितीच्या वतीने जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्ग्यावर चादर अर्पण करण्यात आली. सायंकाळी आनंदवल्ली येथे मिलादची मैफल पार पडली. तत्पूर्वी मुस्लीम बांधवांनी कुराणपठण केले.

Web Title: Anandalatta Sandhal