शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडिया विमानसेवेसाठी उत्सुक

By admin | Updated: April 12, 2015 00:34 IST

सहानी : विविध ठिकाणच्या पर्यायांचा विचार

नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विमानसेवा सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना एअर इंडियाचे पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. या कंपनीने नाशिकमधून विमानसेवा सुरू करण्याचा विचार करू, असे आश्वासन एअर इंडियाचे सहायक महाव्यवस्थापक हरजित सहानी यांनी देतानाच नाशिकमधून कोणत्या राज्यांना जोडणारी सेवा सुरू करता येईल, या पर्यायांची चाचपणी केली.एअर इंडियाचे सहायक महाव्यवस्थापक हरजित सहानी आणि त्यांचे सहकारी विजय बैरागी यांनी विमानसेवेसंदर्भात शुक्रवारी नाशिकच्या महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या सारडा संकुल येथील कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी सहानी यांनी हा मनोदय व्यक्त केला. नााशिकमधून कोणत्या भागांना जोडणारी विमानसेवा सुरू करता येईल, या विषयावर यावेळी चर्चा झाली. त्यानुसार नाशिक-मुंबई-बंगळुरू, नाशिक- पुणे- बंगळुरू, नाशिक- नागपूर- बंगळुरू, नाशिक- इंदोर- कोलकाता, त्याचप्रमाणे सिंगापूर, बॅँकॉक, पट्टाया आणि युरोपीय देशात अशी सेवा सुरू करणे सोयीचे ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. नाशिकमधून सेवा सुरू करण्यास एअर इंडियाचे प्राधान्य राहील, असे मत यावेळी सहानी यांनी व्यक्त केले.चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी प्रास्तावक केले. नाशिकमध्ये ओझर येथे सुसज्ज विमानतळ तयार आहे. त्याचा वापर आता सुरू झाला पाहिजे. नाशिकमध्ये नुकतीच टुरिझम कॉन्लेक्व झाली. यावेळी नाशिकला पर्यटकांना आणण्याची बहुतांशी टूर आॅपरेटर्सची इच्छा आहे. लवकरच कुंभमेळा सुरू होत आहे, त्यामुळे नाशिकमधून विमानसेवा सुरू करण्यास हीच संधी असल्याचे मत मंडलेचा यांनी व्यक्त केले आणि लवकरात लवकर सेवा सुरू करावी, अशी मागणी केली. यावेळी चेंबरचे कार्यकारिणी सदस्य उमेश वानखेडे, तसेच भावेश मानेक यांच्या हस्ते सहानी आणि बैरागी यांचा सत्कार करण्यात आला. चर्चेत उमेश वानखेडे, संजय सोनवणे, प्रमोद पुराणिक, दिलीप बेनिवाल, राजू राठी, शशांक पहाडे यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)