शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

.कांद्याचे भाव कोसळल्याने येवल्यात आंदोलन

By admin | Updated: September 29, 2014 22:21 IST

कांद्याचे भाव कोसळल्याने येवल्यात आंदोलन

येवला : आगामी सणासुदीच्या दिवसांत कांद्याचे भाव वाढू नये म्हणून केंद्र शासनाने पाकिस्तान व अफगाणस्तिान येथून कांदा आयात करण्याचे धोरणामुळे व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव २०० रुपये प्रती क्विंटल पुकारायला सुरुवात करताच येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले व येवला-मनमाड रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देऊन सुमारे अर्धा तास स्वयंस्फूर्तीने रास्ता रोको केला. यामुळे अर्धा तास वाहतूक खोळंबली. सोमवारी सकाळी सव्वादहा वाजता येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे नेहमीप्रमाणे लिलाव सुरु झाले. बाजार आवारात २५० ट्रक्टर कांद्याची आवक होती.व्यापाऱ्यांनी कांदा लिलावाची बोली २०० रु पयांपासून बोलायला सुरुवात करताच शेतकरी संतप्त झाले व कांदा लिलाव बंद पडले आणि शेतकरी घोषणाबाजी करीत बाजार समिती प्रवेशद्वाराजवळ आले. येवला -मनमाड रस्त्यावरील वाहतूक अडवली व अर्धा तास रास्ता रोको केला. दरम्यान, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, बाजार समिती सभापती शिवाजी वडाळकर, सचिव डी. सी. खैरनार, शेतकरी नेते संतू पाटील झांबरे, कांदा व्यापारी नंदू अट्टल, उमेश अट्टल, प्रदीप गुजराथी, हुसेन शेख सुभाष समदडिया, मनोज समदडिया यांनी मध्यस्थी करीत व आचारसंहितेचे कारण देत आता आंदोलनाचा काहीही उपयोग होणार नाही. आपण बाजार समितीच्या सभागृहात जाऊन चर्चा करू, अशी विनंती आंदोलकांना केली आणि आंदोलन थांबले. सारे कांदा उत्पादक आंदोलक शेतकरी बाजार समिती सभागृहात परतले. यावेळी झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रि या व्यक्त केल्या.